शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:02 IST

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली.

S Jaishankar briefs MPs on Bangladesh :बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर आता अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे. दरम्यान, बांगलादेशच्या संकटावर भारताचं बारीक लक्ष आहे. बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज मंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. 

बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश - जयशंकर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. जयशंकर  म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले आहेत. शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात आल्या आहेत. त्या येथून ब्रिटन किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकतात.

बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? बांगलादेशात मार्शल लॉ लागू झाला, तर भारत त्याचा सामना कसा करणार? बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? चीन आणि पाकिस्तानची भूमिका काय असेल? याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे राजकीय पक्षांना माहिती देऊ शकतात.

परराष्ट्र मंत्री संसदेत उत्तर देतीलबांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात संसदेत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मोदी सरकारला सर्व पक्षांना विश्वासात घ्यायचे आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील परिस्थितीचा दिला.

राहुल गांधींनी बैठकीत विचारले 'हे' सवालबांगलादेशातील परिस्थितीमध्ये परकीय हात आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी बैठकीत केला. या परिस्थितीबाबत भारताकडे काही दीर्घकालीन योजना आहे का? बांगलादेशच्या नव्या सरकारबाबत भारताचा अॅक्शन प्लॅन काय असेल? बैठकीत इतर पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत, असे विरोधकांनी सांगितले.

काल रात्री मोदींसोबत बैठकसोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS)  बैठक झाली. बांगलादेशातील सत्तापालटाचा भारतावर काय परिणाम होईल? या विषयावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होत्या.

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशRahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंह