नामपूर येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टी

By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:12+5:302015-07-12T21:58:12+5:30

नामपूर : सामाजिक एकोपा टिकून रहावा, यासाठी सर्वधर्मीय सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करून सहिष्णुतेचे पालन करावे, असे आवाहन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले.

All-party Iftar Party at Nampur | नामपूर येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टी

नामपूर येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टी

मपूर : सामाजिक एकोपा टिकून रहावा, यासाठी सर्वधर्मीय सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करून सहिष्णुतेचे पालन करावे, असे आवाहन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले.
येथील आझाद-हिंद फ्रेंड सर्कल, मुस्लीम पंच कमिटी, गौस कमिटी यांच्या वतीने आझाद हिंद चौकात झालेल्या इफ्तार पार्टीत ते बोलत होते. सरपंच जिभाऊ मोरे अध्यक्षस्थानी होते. पुढे चव्हाण म्हणाले की, मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, संभाजीराव सावंत, समाजसेवक भास्कर सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत, अशोक पवार, अश्पाक पठाण, नारायण सावंत, मुस्लीम पंच कमिटीचे अध्यक्ष हाजी जमिर पठाण, अन्सार शेख, रऊफ शेख, उस्मान शहा आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदू समाजबांधवांनी, रोजेधारकांना फळे व फरसाण देऊन उपवास सोडण्यात आले. साजीद अहमद यांनी सूत्रसंचालन केले.
----
फोटो कॅप्शन
नामपूर येथील आझाद हिंद चौकात झालेल्या इफ्तार पार्टीत सहभागी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अशोक सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सरपंच जिभाऊ मोरे आदि मान्यवर.
-----

Web Title: All-party Iftar Party at Nampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.