शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

आग्र्यामध्ये परदेशी पर्यटकांना मारहाण : हल्ला करणारे सर्व पाच आरोपी गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 07:40 IST

उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिकरी येथे 22 ऑक्टोबरला स्विर्त्झलँडमधील जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.

आग्रा - फतेहपूर सिकरी येथे 22 ऑक्टोबरला स्विर्त्झलँडमधील जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी सुलखान सिंह या प्रकरणासंबंधी ट्विट करत माहिती दिली की, चौकशीदरम्यान पाच आरोपींचा या घटनेत समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व पाच आरोपींना अटकही करण्यात आली आहे. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहितीदेखील समोर आली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या हल्ल्यात परदेश पर्यटक  क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण गुरुवारी त्यांना डिस्जार्च देण्यात आला आहे.  

नेमकी आहे घटना?

भारत भ्रमंती करण्यासाठी आलेल्या स्विर्त्झलँडमधील प्रेमी युगुलाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिकरी येथे एका वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. फतेहपूर सिकरी येथे काही जणांच्या टोळक्यानं या परदेशी जोडप्यावर दगड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. रविवारी (22 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. रक्तानं माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारी-जाणारी लोकं मात्र त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परदेशी पर्यटकांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे आणि राज्य सरकारला उत्तरासहीत अहवाल सादर करायला सांगितले आहे. शिवाय, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन पर्यटकांची भेट घेण्यासही सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मेरी द्रोज आणि क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क असे मारहाण झालेल्या परदेशी पर्यटकांचं नाव आहे. 30 सप्टेंबरला मैत्रीण मेरी द्रोजसोबत भारतात आलेले क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क सध्या दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मारहाण प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले की, ''रविवारी (22 ऑक्टोबर) फतेहपूर सिकरी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असताना, यादरम्यान काही तरुणांच्या घोळक्यानं त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या घोळक्यानं काहीतरी टिप्पणी केली, पण आम्हाला काहीही समजलं नाही. त्यानंतर सेल्फी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला जबरदस्तीनं रोखून ठेवलं''.

परदेशी पर्यटकांना त्रास देण्याच्या या प्रकाराचं काही वेळानं हाणामारीमध्ये रुपांतर झाले. पाठलाग करणा-या या घोळक्यानं क्लॉर्कचं डोकंच फोडलं. दरम्यान, या मारहाणीमुळे क्लॉर्क यांना एका कानानं कमी ऐकू येणार असल्याचं त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले आहे. मेरीदेखील या हल्ल्यात जखमी झाली आहे. 

''हल्ल्यानंतर आम्ही रक्तानं माखलेल्या अवस्थेतच रस्त्यावरच पडलो होतो आणि येणारी-जाणारी लोकं आम्हाला मदत करण्याऐवजी मोबाइलवर आमचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होती'', अशी नाराजीही क्लॉर्कनं यावेळी व्यक्त केली.  क्लॉर्क  पुढे असेही म्हणाले की,''विरोध केल्यानंतर त्या घोळक्यानं आमचा पाठलाग करणं थांबवलं नाही. आमचे फोटो घेत होते, एवढंच नाही तर मेरीच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न करत होते. त्यांना आम्हाला कुठेतरी घेऊन जायचे होते. मात्र विरोध केल्यानंतर त्यांनी आम्हाला दगड-लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली''. 

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtourismपर्यटनyogi adityanathयोगी आदित्यनाथ