पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे सर्व ६ अतिरेकी ठार
By Admin | Updated: January 4, 2016 17:59 IST2016-01-04T09:35:49+5:302016-01-04T17:59:57+5:30
मागच्या तीन दिवसांपासून पठाणकोट येथे सुरु असलेल्या चमकीत सुरक्षा पथकांनी पाचव्या अतिरेक्याचा खातमा केला असून, सहाव्या अतिरेक्यांचा मृतदेह अजून हाती लागलेला नाही.

पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे सर्व ६ अतिरेकी ठार
>ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. ४ - मागच्या तीन दिवसांपासून पठाणकोट येथे सुरु असलेल्या चमकीत सुरक्षा पथकांनी पाचव्या अतिरेक्याचा खातमा केला असून, सहाव्या अतिरेक्यांचा मृतदेह अजून हाती लागलेला नाही.
दहशतवादी ज्या इमारतीमध्ये लपले होते ती इमारत सुरक्षापथकांनी स्फोटामध्ये उडवून दिली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतरच सर्व दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येईल. चकमक संपली असली तरी, शोध मोहिम अजून काही तास सुरु रहाण्याची शक्यता आहे.
शनिवारी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर मोहिम फत्ते झाली असे वाटले होते मात्र रविवारी दुपारी दबा धरुन बसलेले दोन अतिरेकी समोर आले आणि पुन्हा चकमक सुरु झाली. चकमकीत एकूण ७ जवान शहीद तर २० जवान जखमी झाले आहे. शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी भारत-पाकिस्तान सीमेपासून ३५ कि.मी. अंतरावरील पठाणकोटच्या एअरबेसला लक्ष्य बनविले. त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याचे समोर आले असून गेल्या ४० हून अधिक तास ही चकमक सुरू आहे. अंधारामुळे शनिवारी रात्री मोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू होताच आणखी दोन अतिरेकी दडून असल्याची माहिती मिळाली. लागूनच असलेल्या घनदाट जंगलामुळे अतिरेक्यांच्या नेमक्या संख्येबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. माहिती मिळताच त्वरित मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे एअरबेसच्या तांत्रिक क्षेत्राचे नुकसान झालेले नाही