एकता पॅनलचे सर्व ११ उमेदवार विजयी शासकीय कर्मचारी पतपेढी : सहकार पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:52+5:302016-02-02T00:15:52+5:30
जळगाव : जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवित सहकार पॅनलला पराभूत केले.

एकता पॅनलचे सर्व ११ उमेदवार विजयी शासकीय कर्मचारी पतपेढी : सहकार पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत
ज गाव : जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवित सहकार पॅनलला पराभूत केले.जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक ३१ जानेवारी रोजी झाली. संचालकपदाच्या ११ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यात ११४२ पैकी ७८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत मतदानप्रक्रिया आटोपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. कोठावदे यांनी संध्याकाळी सात वाजता मतमोजणी करीत विजयी उमेदवारांची घोषणा केली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.इन्फो-एकता पॅनलचे विजय उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण मतदार संघ : मिलिंद सुरेश बुवा, नितीन भाऊराव देशमुख, रामदास धर्मा कचरे, प्रमोद गणपतराव नगरकर, जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे, अभिजित नामदेव येवले. इतर मागासवर्गीय - विकास नारायण चौधरी. अनूसुचित जाती - विलास जगन्नाथ भालेराव. भटके विमुक्त - रवींद्र नामदेव उगले. महिला राखीव- ज्योती विलास भोळे व सोनल अरविंद पाटील यांचा समावेश आहे.सहकार पॅनलचे पराभूत झालेले उमेदवारसर्वसाधारण मतदार संघ - गिरीश वसंतराव बाविस्कर, डिगंबर भिकन जाधव, रवींद्र भगवान माळी, जितेंद्र शिवराम नेहते, रवींद्र श्रीराम ठाकूर. इतर मागासवर्गीय- दिलीप रामदास बारी. अनुसूचित जाती/जमाती - राजेंद्र आधार वाडे, भटके विमुक्त - किशोर भिका ढोले. महिला राखीव - स्मिता मिलिंद चौधरी, रेखा शांताराम सोळुंके हे उमेदवार पराभूत झाले आहेत.