शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तीन विद्यार्थ्यांनी चक्क 'हिजबुल'च्या दहशतवाद्यासाठी घेतली शोकसभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 12:30 IST

मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

अलिगढ - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला होता. 

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी ( 11 ऑक्टोबर ) जवान आणि दहतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यामध्ये मन्नानचा समावेश होता. मन्नानच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात 15 विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे ही सभा घेतली. 

याप्रकरणी विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे तर अन्य चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड तपासला जाणार आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेनेही या विद्यार्थ्यांना नमाज अदा करण्यापासून रोखले होते. विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष फैजुल हसन यांनी सभेच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यासाठी नमाज अदा करणे योग्य नव्हे, असे सांगत या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. मन्नानचे हातात रॉकेट लाँचर घेतलेले छायाचित्र आणि त्याने लिहीलेले खुले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आम्हाला भारतीय असोत किंवा काश्मिरी नागरिक असोत कोणालाही ठार करण्यात काहीही स्वारस्य नाही, जे आम्हाला दहशतवादी म्हणतात त्यांनी एक तर त्यांची पाठ्यपुस्तके बदलावीत किंवा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणजे लढणे हे आमचे काम नसून ती आमची गरज आहे हे आमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या लक्षात येईल असेही मन्नान वाणीने त्याच्या पत्रात म्हटले होते. मात्र गुरुवारी झालेल्या चकमकीत त्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. 

टॅग्स :Mannan Waniमन्नान वानीHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनterroristदहशतवादीStudentविद्यार्थी