शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Aligarh Child Murder : अलीगडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 11:16 IST

उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

अलीगड - उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. एका दाम्पत्याने 10 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच काही अफवा ही पसरवल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ट्विंकल असं या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

Aligarh Child Murder : आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय द्या तसेच आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी 'अलीगडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची अशाप्रकारे क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय तयार होतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे' असं ट्वीट केलं आहे. तसेच 'अलीगडमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार करायलाही भीती वाटते. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये टप्पल परिसरात एक दाम्पत्य राहते. त्यांची अडीच वर्षाची मुलगी ट्विंकल ही चार दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर गावाबाहेरील कचराकुंडीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच मृतदेह कचराकुंडीत फेकल्याने भटके कुत्रे तिच्या मृतदेहाजवळ असलेले काही ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. 

मुलीच्या मृतदेह सापडल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. मुलीवर बलात्कार झाला नव्हता, मात्र तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून चार जणांना अटक केली तसेच तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कर्जासाठी अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचं सांगितलं. आरोपींचा मुलीच्या आई-वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. दाम्पत्याने त्यांच्याकडून दहा हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची त्यांनी परतफेड केली नसल्याने वाद झाला होता. त्यातूनच आरोपींनी दाम्पत्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती. मुलीच्या वडिलांनी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.  

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनPoliceपोलिसArrestअटक