मद्यधुंद विद्यार्थ्याच्या अलिशान पोर्शने दिली 12 रिक्षांना धडक, 1 ठार
By Admin | Updated: September 19, 2016 14:48 IST2016-09-19T14:39:55+5:302016-09-19T14:48:33+5:30
दारुच्या नशेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या अलिशान पोर्श कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या 12 रिक्षांना

मद्यधुंद विद्यार्थ्याच्या अलिशान पोर्शने दिली 12 रिक्षांना धडक, 1 ठार
ऑनलाइन लोकमत
चेन्नई,दि.19- चेन्नईमध्ये अलिशान पोर्श कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दारुच्या नशेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या अलिशान पोर्श कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या 12 रिक्षांना धडक दिली. 22 वर्षीय हा विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयातील वकीलांचा मुलगा आहे. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅथेड्रल रोडवर जवळपास 12 रिक्षा रांगेत उभ्या होत्या, विकास विजय आनंद (22) आणि त्याचा मित्र चरणकुमार रात्री झालेल्या एका पार्टीवरुन परत येत होते. अत्यंत वेगात असल्याने कारचालक विकासचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट रांगेत थांबलेल्या रिक्षांना धडक देत पुढे गेली.
या घटनेत रिक्षांमध्ये झोपलेले तीन जण जखमी झाले, आणि एक जण जागीच ठार झाला. तर रिक्षा अक्षरशः चकनाचूर झाल्या.निळ्या रंगाच्या अलिशान पोर्शेचेही प्रचंड नुकसान झाले. मात्र, कारच्या एअरबॅग्समुळे कारचालक आणि त्याचा मित्र सुरक्षित राहीले व त्यांना कोणतीही जखम झाली नाही.