सतर्क जवानांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
By Admin | Updated: April 10, 2017 12:22 IST2017-04-10T10:07:27+5:302017-04-10T12:22:29+5:30
भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करणा-या चार पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय लष्कराने सोमवारी खात्मा केला.

सतर्क जवानांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 10 - भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करणा-या चार पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय लष्कराने सोमवारी खात्मा केला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरान भागात ही चकमक झाली. सध्या या भागात लष्कराकडून शोधमोहिम सुरु आहे.
केरान सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचा गट भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होता पण सर्तक असलेल्या जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. मागच्या काही दिवसात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरु आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो. भारतानेही आतापर्यंत प्रत्येक गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.