शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

US-इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:02 IST

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत

नवी दिल्ली - इराणविरुद्धइस्रायलअमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. अमेरिकाइस्रायल तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराण बदला घेण्याच्या मानसिकतेत आहे. इराणने इस्रायलसह ९ देशांना टार्गेट बनवले आहे. इराणशिवाय अन्य देशातही खामेनेई यांच्या मृत्यूविरोधात प्रदर्शने सुरू आहेत. त्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही सर्व राज्यांना पत्र लिहून अलर्ट केले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचारापूर्वी सतर्क राहा. २८ फेब्रुवारीला हे पत्र प्रसारित केले होते. ज्यात राज्यांना भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवा असं सांगितले होते. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणाऱ्या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणाऱ्या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

अमेरिकेशी चर्चा करण्यास इराणचा नकार

इराण यापुढे अमेरिकेशी चर्चा करण्यास तयार नाही असं इराणी अधिकाऱ्याने म्हटल्याचे पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने बातमी दिली. इराणच्या नवीन नेतृत्वाशी बोलण्यास तयार आहेत असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी संकेत दिले होते. मात्र इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी 'एक्स' वर कडक इशारा दिला. 'आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलने रविवारी इराणमधील अनेक ठिकाणी जोरदार हल्ले केले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांवर बॉम्बहल्ला केला आणि युद्धनौका देखील उद्ध्वस्त केल्या असं सांगितले आहे.

दरम्यान, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India on Alert Amid US-Israel-Iran Conflict; Advisory Issued

Web Summary : India is on alert after rising tensions between the US, Israel, and Iran following attacks and the death of Iran's leader. The Home Ministry has issued an advisory to states, urging vigilance against potential unrest and monitoring pro-Iran sentiment.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलHome Ministryगृह मंत्रालय