India China Border News: धोक्याची घंटा! चिनी सैन्याचा उत्तराखंडमध्ये मोठा धुडगूस; रस्ते, पूल तोडून पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:12 PM2021-09-28T12:12:09+5:302021-09-28T12:16:10+5:30

India China Border News: लडाखमध्ये भारतीय सैन्याने जमवाजमव सुरु केल्याने चीनने उत्तराखंडमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे यावरून दिसत आहे. यामुळे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. 

Alarm bell! Chinese infiltration into Uttarakhand; PLA broke roads, bridge and fled | India China Border News: धोक्याची घंटा! चिनी सैन्याचा उत्तराखंडमध्ये मोठा धुडगूस; रस्ते, पूल तोडून पळाले

India China Border News: धोक्याची घंटा! चिनी सैन्याचा उत्तराखंडमध्ये मोठा धुडगूस; रस्ते, पूल तोडून पळाले

googlenewsNext

लडाखनंतर चीनी सैनिकांनी उत्तराखंडमध्ये मोठी घुसरखोरी केली आहे. भारताला उकसविण्यासाठी चीनने बाराहोती भागातील पूल तोडला आहे. 100 हून अधिक चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसत इन्फ्रास्ट्रक्चरची नासधूस केल्याचा प्रकार घडला आहे. (Chinese PLA in Uttarakhand's Barahoti, returns after damaging bridge)

China Power Crisis: चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले

उत्तराखंडमधील परिस्थीतीची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागे परतताना चिनी सैनिकांनी एक पूलही तोडले आहे. लडाखमध्ये भारतीय सैन्याने जमवाजमव सुरु केल्याने चीनने उत्तराखंडमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे यावरून दिसत आहे. यामुळे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. 

बाराहोती भागात याआधीही चिन्यांनी घुसखोरी केलेली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये देखील अशा प्रकारची वृत्ते आली होती. तेव्ही तीनवेळा घुसखोरी झाल्याचे सांगण्यात आले होते. 1954 मध्ये हा पहिला असा भाग होता जिथे चीनने घुसखोरी केली होती. यानंतर दुसऱ्या भागांवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर 1962 चे युद्ध झाले होते. 

China on LAC: चीनच्या एलएसीवर जोरदार हालचाली; 50000 सैनिक, शस्त्रास्त्रे तैनात

उत्तराखंडमध्ये झालेली ही घटना 30 ऑगस्टला झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याला कळेपर्यंत ते माघारी परतले होते. तुनतुन ला पास पार करून 55 घोडेस्वार आणि 100 हून अधिक चिनी सैनिक भारतीय हद्दीत 5 किमीपेक्षा जास्त आतमध्ये घुसले होते. चीनचे हे सैनिक जवळपास 3 तास या भागात होते. हा भाग सैन्य नसलेला भाग आहे. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिक तिथे येणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. स्थानिकांनी आयटीबीपीला याची माहिती दिली. आयटीबीपीचे जवान तिथे जाईस्तोवर चिनी सैन्य नासधूस करून परतले होते. इकॉनॉमिक टाइम्सने संरक्षण दलातील सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 

Web Title: Alarm bell! Chinese infiltration into Uttarakhand; PLA broke roads, bridge and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.