बर्दवान स्फोटातील मुख्य आरोपी आलमला अटक
By Admin | Updated: December 6, 2014 23:46 IST2014-12-06T23:46:59+5:302014-12-06T23:46:59+5:30
संशयित अतिरेकी शाहनूर आलम याला आसाम पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली़

बर्दवान स्फोटातील मुख्य आरोपी आलमला अटक
गुवाहाटी : पश्चिम बंगालच्या बर्दवान स्फोटातील प्रमुख संशयित अतिरेकी शाहनूर आलम याला आसाम पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली़ येथील एका न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली़
लोकांना कथितरीत्या जिहादसाठी भडकविणो आणि त्यांना प्रशिक्षण देणा:या आलमला आसामातील नलबाडी जिल्ह्याच्या लारकुछी गावातून अटक करण्यात आली़
आलमच्या अटकेसोबतच बर्दवान स्फोटप्रकरणी आसामात अटक झालेल्यांची संख्या आता दहा झाली आह़े फोन रेकॉर्ड आणि यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी साजीद याच्या चौकशीतून आलमचे नाव पुढे आले होत़े एनआयएने गत महिन्यात आलमच्या पत्नीला अटक केली होती़ शाहनूर आलम हा आसामच्या बरपेटा जिल्ह्यातील चटाला गावचा आह़ेएनआयएने त्यांच्या शिरावर पाच लाख रुपयांचे इनाम ठेवले होत़े (वृत्तसंस्था)