भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 02:52 PM2019-07-10T14:52:12+5:302019-07-10T15:12:26+5:30

ओसामा बिन लादेनची दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा खतरनाक दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली आहे.

al qaeda chief al zawahari thretens indian government and army | भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी

भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी

Next

नवी दिल्लीः ओसामा बिन लादेनचीदहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा खतरनाक दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली आहे. जवाहिरीनं काश्मीरमध्ये भडकावण्यात येत असलेल्या दहशतवादावरून इशारा दिला आहे. डोन्ट फॉरगेट कश्मीर, असा संदेशही दिला असून, त्यावर मुसाचाही फोटो लावण्यात आला आहे. काश्मीरमध्ये लढत असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवायचं आहे.

या दहशतवाद्यांनी एक रणनीती तयार केली पाहिजे. जवाहिरीनं काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा जवानांच्याविरोधात आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. 14 मिनिटांच्या मेसेजमध्ये जवाहिरी म्हणतो, माझ्या विचारानं काश्मीरमध्ये मुजाहिद्दीननं एकचित्त होऊन भारतीय लष्कर आणि सरकारवर निशाणा साधला पाहिजे. त्यांना आत्मघातली हल्ल्यांसारखे घातपात घडवून आणावे लागतील. अशानं भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, तसेच भारतीय लष्कराला याचा मोठा भुर्दंड पडेल. 

अतिरेकी संघटना अल कायदा भारतीय उपखंडात अधिक सक्रिय होत असून, या संघटनेने आतापर्यंत शेकडो सदस्य बनविले आहेत. या संघटनेचे बहुतांश ठिकाणी अफगाणिस्तानात आहेत आणि संघटनेचे प्रमुख बांगलादेशात आहेत. दहशतवादविरोधी तज्ज्ञांनी अमेरिकी संसद सदस्यांना ही माहिती दिली होती. लष्करी डावपेचातील तज्ज्ञ सेथ जी जोन्स यांनी म्हटले होते की, अल कायदाने भारतीय उपखंडात शेकडो सदस्य बनविले आहेत. त्यांची ठिकाणे अफगाणिस्तानातील हेलमंद, कंधार, जाबुल, पख्तिया, गजनी आणि नूरिस्तान प्रांतात आहेत. अफगाणिस्तानातील अल कायदाचे अस्तित्व गत पाच ते दहा वर्षांच्या तुलनेत सध्या अधिक आणि विस्तारित आहे. जोन्स यांनी ही माहिती सभागृहाच्या अंतर्गत सुरक्षा उपसमितीसमोर सांगितली होती. 

Web Title: al qaeda chief al zawahari thretens indian government and army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.