शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

देशभक्त खिलाडी! अक्षयनं केली शहिदांच्या कुटुंबीयांना 13 कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 14:42 IST

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या खिलाडी अक्षयकुमारने पुन्हा एकदा आपली देशभक्ती दाखवून दिली.

नवी दिल्ली - शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या खिलाडी अक्षयकुमारने पुन्हा एकदा आपली देशभक्ती दाखवून दिली. एका कार्यक्रमामध्ये त्यानं शहिदांच्या कुटुंबीयांना 13 कोटींची मदत केली. केवळ चित्रपटांमध्येच त्याचे देशप्रेम दिसून येत नाही तर वास्तविक जीवनातही तो वेळोवेळी देशाप्रतीचा आदर दाखवित आला आहे.

नवी दिल्लीला काल अक्षय ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता. परंतु याठिकाणी अक्षयचे वेगळेच रूप बघावयास मिळाले. त्याने पुन्हा एकदा आपल्यातील देशभक्ती दाखवून देताना शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल 12.93 कोटी रूपयांची मदत केली. याविषयीची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी शेअर केली.  

वास्तविक अक्षयने यापूर्वी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी वेळोवेळी मदत दिली आहे. याच कारणामुळे अक्षयला संबंध देशातून प्रचंड प्रेम मिळत आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत असून, आगामी ‘पॅडमॅन’ही असाच करिश्मा दाखवेल अशी शक्यता आहे. दरम्यान, अक्षय सध्या त्याच्या ‘केसरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘गोल्ड’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. 

अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सामाजिक प्रश्नावर आधारित असलेला त्याचा हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार होता. परंतु संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचे मैत्रिपूर्ण संबंध टिकविण्याच्या हेतूने अक्षयने त्याच्या चित्रपटाची रिलीज डेट बदलली. 

अक्षय कुमारची 'ती' सायकलही देणार समाजकार्यात योगदान

'पॅडमॅन' या चित्रपटात त्याने वापरलेल्या सायकलचा लिलाव करून तो 'पॉप्युलेशन फर्स्ट' या संस्थेला आर्थिक सहकार्य करणार आहे.  महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन स्वस्तात बनवण्याचं तंत्र शोधून काढणारे आणि खेडोपाडी जाऊन महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनबाबत जागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री अरुणाचलम मुरुगनानथम यांचा प्रेरणादायी प्रवास 'पॅडमॅन' या चित्रपटात आहे. त्यात अरुणाचलम यांची भूमिका अक्षय कुमारनं साकारलीय. अरुणाचलम यांच्या आयुष्यात त्यांची सायकल हा अविभाज्य भाग राहिलाय. म्हणूनच, या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरमध्ये अक्षय एका सायकलवर बसलेला पाहायला मिळतोय. स्वाभाविकच, या सायकलला वेगळं महत्त्व, वलय प्राप्त झालंय. त्याचाच फायदा सामाजिक कार्यासाठी करून घ्यायचं अक्षय आणि ट्विंकलनं ठरवलंय. 'पॅडमॅन' चित्रपटात वापरलेल्या सायकलचा लवकरच लिलाव होणार आहे. त्यातून जो निधी मिळेल, तो 'पॉप्युलेशन फर्स्ट' या स्वयंसेवी संस्थेला दिला जाईल. ही संस्था गेली अनेक वर्षं महिलांच्या आरोग्याबाबत काम करतेय. 101 गावांमध्ये त्यांच्या कार्याचा विस्तार आहे. त्यांचं काम पाहून अक्षय - ट्विंकल प्रभावित झाले आणि त्यांनी या संस्थेला मदत करण्यासाठी लिलावाचा आगळा फॉर्म्युला ठरवला. 

'पॅडमॅन'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली!

दरम्यान, बहुचर्चित 'पद्मावत' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्यानंतर, 'पॅडमॅन'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आधी 'पॅडमॅन'ही 25 जानेवारीलाच प्रदर्शित होणार होता, पण आता तो 9 फ्रेबुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांचा बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष टळलाय. संजय लीला भन्साळी यांच्या विनंतीवरून अक्षयने 'पॅडमॅन'चं प्रदर्शन पुढे ढकललंय. पद्मावतला सिनेमा लवकर प्रदर्शित करण्याची जास्त गरज आहे, हे ओळखून हा निर्णय घेतल्याचं अक्षयनं सांगितलं. 9 हा अक्षयचा 'लकी नंबर' असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्याच्या 'लकी' तारखेला प्रदर्शित होणारा पॅडमॅन बॉक्स ऑफिसवर कशी कमाल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.  

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारPadmanपॅडमॅन