केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खोचक टीका केली आहे. "ज्या सरकारकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नाही, त्यांच्या बजेटकडून काय अपेक्षा ठेवणार? हे बजेट केवळ १/२० लोकांसाठी म्हणजेच फक्त ५ टक्के लोकांसाठी आहे" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
देश आणि राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत ते पुढे म्हणाले, "जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर आज हा प्रश्न उभा राहिला आहे की तुमच्या देशातील हवाच शुद्ध नाही. यामुळे लोकांचे जीव जात आहेत आणि यामुळे देशात गुंतवणूकही येणार नाही." संसदेत जाण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी बजेट २०२६ बाबत ही प्रतिक्रिया दिली.
"भाजपा फक्त आपल्याच लोकांना खूश करते”
"भाजप सरकारकडून अपेक्षा नाही, तर त्यांच्या बजेटकडून काय असणार? बजेटच्या माध्यमातून भाजपा फक्त आपल्याच लोकांना खूश करते. खरे बजेट तेच असते ज्यातून गरीबांचे कल्याण होईल. किती स्मार्ट सिटी तयार झाल्या? रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचं काय झालं?" असा सवालही मोदी सरकारच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून देताना विचारला.
"सरकार लोकांना पिण्याचं शुद्ध पाणीही देऊ शकलं नाही"
भाजपा सरकारवर निशाणा साधताना अखिलेश यादव म्हणाले की, सरकार एकाही आश्वासनावर खरी उतरलेली नाही. सरकार लोकांना पिण्याचं शुद्ध पाणीही देऊ शकलं नाही. "इंदूरसारख्या स्मार्ट सिटीमध्ये दूषित पाण्यामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झाला. जगासमोर भारताच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण आपली हवा प्रदूषित आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारही पाठ फिरवत आहेत" असंही त्यांनी नमूद केलं.
Web Summary : Akhilesh Yadav criticized the budget, deeming it pro-rich and questioning the BJP's delivery on promises like doubling farmer income and clean water. He highlighted pollution's impact on investment.
Web Summary : अखिलेश यादव ने बजट की आलोचना करते हुए इसे अमीर-समर्थक बताया और भाजपा द्वारा किसानों की आय दोगुनी करने और स्वच्छ पानी जैसे वादों को पूरा करने पर सवाल उठाए। उन्होंने प्रदूषण के निवेश पर पड़ने वाले प्रभाव पर प्रकाश डाला।