पद मिळताच अखिलेशच्या डोक्यात हवा गेली - मुलायमसिंह यादव
By Admin | Updated: October 24, 2016 12:09 IST2016-10-24T11:51:01+5:302016-10-24T12:09:59+5:30
समाजवादी पार्टी बनवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. जे आज उडया मारत आहेत

पद मिळताच अखिलेशच्या डोक्यात हवा गेली - मुलायमसिंह यादव
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्षामध्ये मुलगा अखिलेश आणि भाऊ शिवपाल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी भाऊ शिवपालची बाजू उचलून धरली आहे. पद मिळताच डोक्यात हवा गेली असा टोला त्यांनी अखिलेशला लगावला.
माझ्यासाठी आणि समाजवादी पार्टीसाठी शिवपालने जे केले ते मी कधीच विसरु शकत नाही. शिवपाल समाजवादी पार्टीचा मोठा नेता आहे असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले. मी कमकुवत झालो आहे असा समज तुम्ही करुन घेऊ नका असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.
समाजवादी पार्टी बनवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. जे आज उडया मारत आहेत ते एक लाठीही खाऊ शकत नाहीत. समाजवादी पक्षात जो संघर्ष सुरु आहे त्याने खूप दु:ख झाले अशा शब्दात मुलायमसिंह यादव यांनी सध्या पक्षातंर्गत सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
आणखी वाचा
लखनऊमध्ये पक्ष पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जर तुम्ही टीका सहन करु शकत नाही तर तुम्ही नेता बनू शकत नाहीत असे मुलायमसिंह म्हणाले. लोहीयाजींनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरुन पुढे जा. आपल्यात ज्या त्रूटी आहेत त्या दूर करण्याऐवजी आपण आपसात भांडत बसलो असे मुलायम यांनी सांगितले. त्याचवेळी मुलायम यांनी शिवपाल यादव पक्षाचे मोठे नेते असल्याचे सांगून अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.