शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 22:29 IST

अखिलेश यादवांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. सपाने एक्स हॅडलवर याची माहिती दिली आहे. राज्यातील एकच जिल्ह्यात कार्यकारिणी तशीच ठेवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन वर्षांत दोन मोठ्या निवडणुका होणार आहेत. मिनी विधानसभा म्हटली जाणारी पंचायत निवडणूक २०२६ मध्ये आहे, यानंतर लगेचच २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादवांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टी मोठ्या तयारीत गुंतली आहे. आज अचानक एक जिल्हा सोडून सर्व जिल्ह्यांच्या कार्यकारणींना बरखास्त करण्यात आले आहे. 

अखिलेश यादवांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. सपाने एक्स हॅडलवर याची माहिती दिली आहे. राज्यातील एकच जिल्ह्यात कार्यकारिणी तशीच ठेवण्यात आले आहे. कुशीनगरच्या नेत्यांना हातही लावण्यात आलेला नाही. 

समाजवादी पक्षाच्या कुशीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षांना सोडून इतर जिल्ह्यांच्या विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांसह विधानसभा कार्यकारिणी आणि इतर आघाडीच्या संघटनांच्या जिल्हाध्यक्षांसह जिल्हा कार्यकारिणी तात्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे, असे प्रदेशाध्यक्ष श्यामलाल पाल यांनी सांगितले. 

कुशीनगरमध्ये दोन महिन्यांपूर्वीच नवीन जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली होती. यामुळे ती वगळण्यात आली आहे. समाजवादी पक्षाने माजी आमदार राम अवध यादव यांना कुशीनगरमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. मोहम्मद शुक्रउल्लाह अन्सारी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. 

सपा आता भाजपाच्या वाटेवर चालू लागली आहे, अनेक जिल्ह्यांत आमदार, खासदारच जिल्हाध्यक्ष देखील होते. यामुळे या लोकांना लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर बाजुला करण्याची चर्चा सुरु होती. ती आता पंचायत निवडणुकीला वर्ष राहिले असताना अवलंबिण्यात आली आहे.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी