शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अखिलेश यादव यांची कन्याही CAA विरोधी आंदोलनात सहभागी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 3:24 PM

सोशल मीडियावर टीना यादवचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोसोबत लिहिले की टीना देखील नागरिकता कायद्याविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाली आहे.

नवी दिल्ली - देशभरात नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध आंदोलन होत आहे.  मागील काही दिवसांत लखनौमध्ये या कायदाला होत असलेला विरोध चर्चेत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नागरिकता कायद्याच्या समर्थनात लखनौमध्ये सभा घेतली आहे. त्यातच सोशल मीडियावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची कन्या टीना यादव हिने सहभाग घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहे.

सोशल मीडियावर टीना यादवचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोसोबत लिहिले की टीना देखील नागरिकता कायद्याविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार टीना आपल्या मित्रांसोबत लखनौ येथील घंटाघरात पोहोचली होती. घंटाघर येथे अनेक दिवसांपासून महिला नागरिकता कायद्याविरुद्ध आंदोलन करत आहेत. 

यावर समाजवादी पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. अखिलेश यादव यांची मुलगी आंदोलनात सामील झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच टीना घंटाघर परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यासोबत कोणीतरी सेल्फी काढला, असं स्पष्टीकरण समाजवादी पक्षाकडून देण्यात आले. अखिलेश यादव सीएए, एनसीआर आणि एनपीआरचा विरोध करत आहेत. देशातील लोकांच्या समस्या सोडविणे होत नसताना असा कायदा आणण्याचा काय उपयोग असा सवालही अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.