शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

 साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 15:06 IST

राज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राम आणि सीतेला पेन्शन द्यावी तसेच त्यातून पैसे वाचलेच तर रावणालाही पेन्शन द्यावीभाजपाच्या महिला आमदारांनी ज्या भाषेचा वापर केला तशी भाषा कुणीही कुणासाठी वापरत नाही

लखनौ - राज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली आहे. योगी सरकारने साधू-संतांना पेन्शन द्यावी. आम्ही सरकारमध्ये असताना रामलीलेमध्ये काम करणाऱ्या राम आणि सीतेच्या पात्रांनी पेन्शन देण्याची योजना सुरू केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राम आणि सीतेला पेन्शन द्यावी तसेच त्यातून पैसे वाचलेच तर रावणालाही पेन्शन द्यावी, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे. योगी सरकारवर टीका करताना अखिलेश यादव म्हणाले,''साधू-संतांना दरमहा कमीत कमी 20 हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच यश भारती आणि समाजवादी पेन्शनसुद्धा सुरू झाली पाहिजे. रामायण पाठ आणि रामलीलावाल्यांनांही पेन्शन द्या.''  स्वप्ने पाहणारे आणि संघर्ष करणारे नवतरुण नवभारत निर्माण करण्याचे काम करतात. समाजवादी पार्टी अशाच गुणवान तरुणांची संघटना आहे, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.  यावेळी मायावतींविरोधात भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या वक्तव्याचाही अखिलेश यादव यांनी निषेध केला. ''भाजपाच्या महिला आमदारांनी ज्या भाषेचा वापर केला तशी भाषा कुणीही कुणासाठी वापरत नाही. भाजपावाले हताशेमधून अशी भाषा वापरत आहेत. आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी त्यांची भाषा अजूनच घसरत जाईल. तसेच केवळ स्थानिक नेत्यांचीच नव्हे तर भाजपाचे मोठे नेतेही अशाच भाषेचा प्रयोग करतात, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.   

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ