शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
3
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
4
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
5
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
6
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
7
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
9
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
10
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
11
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
12
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
13
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
14
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
15
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
16
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
17
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
18
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
19
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
20
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:08 IST

Akhilesh Yadav Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही केलं सविस्तर भाष्य

Akhilesh Yadav Ayodhya Ram Mandir: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एका विशेष कार्यक्रमात अयोध्या येथील राम मंदिरात दर्शनासाठी जाण्याबाबत विषयावर भाष्य केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही त्यांनी रोखठोक मत मांडले. "उत्तर प्रदेशची निवडणूक ही केवळ राज्याची निवडणूक नसते, ती राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक असते. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांसारखे प्रमुख राष्ट्रीय नेते उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. त्यामुळे २०२७च्या उत्तर प्रदेश निवडणुका स्वाभाविकपणे देशाचे राजकीय केंद्र बनतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणादरम्यान बोलताना अखिलेश यादव यांनी अयोध्येतील राम मंदिराला कधी भेट देणार हेदेखील सांगितले.

...तेव्हा राम मंदिरात जाणार

अखिलेश यांनी कार्यक्रमादरम्यान धर्म आणि मंदिरांच्या प्रश्नावर सविस्तरपणे भाष्य केले. "२०१३ मध्ये केदारनाथ आपत्तीनंतर माजी सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांना त्या मंदिरापासून प्रेरित होऊन मंदिर बांधण्याची इच्छा झाली होती. म्हणूनच इटावामध्ये केदारनाथ मंदिर बांधले जात आहे. केदारनाथपासून प्रेरित एक मंदिर तिथे बांधले जात आहे आणि श्रावण महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण करून दर्शन आणि पूजा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा ते मंदिर तयार होईल, तेव्हा मी भगवान रामाचे दर्शन घेण्यासाठीही जाईन. हे सर्व देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. जेव्हा मला बोलावणे येईल तेव्हा मी जाईन," असे ते म्हणाले.

वर्षानुवर्षे हनुमानाची पूजा

"निवडणुकीसाठी ४०० दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक असल्याने समाजवादी पक्ष लोकसभा निवडणुकीपासूनच याची तयारी करत आहे. आमच्या गावात बजरंग बलीची पूजा बऱ्याच काळापासून केली जाते. माजी सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांनीही वर्षानुवर्षे हनुमानाची पूजा केली. आता केदारनाथपासून प्रेरित होऊन मंदिर बांधले जात आहे. या मंदिरासाठी जमीन खरेदी करण्यात आली होती आणि मंदिरासाठी घेतलेली जमीन 'शिवशक्ती अक्ष रेखा' सारख्याच अक्षाशी जुळते हा एक भाग्यवान योगायोग आहे," असेही अखिलेश यादव म्हणाले.

प्रत्येक घरात एक मंदिर

"भाजपला हे माहित नाही उत्तर प्रदेशात प्रत्येक घरात एक मंदिर आहे. अगदी गरीब कुटुंबातही देवाला समर्पित मंदिर नसेल तरीही एखादे देवाचे कॅलेंडर आहे. इटावामधील केदारनाथ मंदिराचा संदर्भ देणे येथे गरजेचे आहे. त्यात डाव्या बाजूला एक बाळकृष्ण आणि उजव्या बाजूला एक रामलला असेल," असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : When will you visit Ayodhya Ram Mandir? Akhilesh Yadav answers.

Web Summary : Akhilesh Yadav will visit Ayodhya's Ram Mandir after the Etawah temple inspired by Kedarnath is complete. He emphasized the importance of the UP election and highlighted his family's long-standing devotion to Hanuman, noting every UP home has a temple.
टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक 2025