अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा बरळले, 15 मिनिटांच्या 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार करत आव्हान दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:42 PM2019-07-24T14:42:31+5:302019-07-24T15:05:26+5:30

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Akbaruddin Owaisi repeats '15 minutes' statement | अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा बरळले, 15 मिनिटांच्या 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार करत आव्हान दिले

अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा बरळले, 15 मिनिटांच्या 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार करत आव्हान दिले

Next

हैदराबाद - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'मी केलेले '15 मिनिटांचे'  वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागले होते. ज्याचे घाव अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो,' असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. 

अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये '' आम्ही 25 कोटी आहोत आणि तुम्ही हिंदू 100 कोटी आहात. 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल,'' असे वक्तव केले होते. त्यावेळी या वक्तव्यावरून खूप वाद झाला होता. दरम्यान,   आजारपणातून सावरल्यानंतर ओवेसी यांनी करीमनगर येथे एका सभेला संबोधित केले.

यावेळी ओवेसी म्हणाले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. हे जग त्याच व्यक्तीला घाबरवते जो घाबरतो. मात्र जग त्या व्यक्तीला घाबरते जो घाबरवणे जाणतो. मी केलेले '15 मिनिटांचे' वक्तव्य अनेकांच्या वर्मी लागले होते. त्याचे भाव अजून भरू शकलेले नाहीत. त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो.'' 



'मुसलमानांनी वाघासारखे शूर व्हावे जेणेकरून कुठलाही चायवाला त्यांच्यासमोर उभा राहू शकणार नाही. मॉब लिंचिंग होत आहे असे लोक म्हणताहेत. मात्र मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की एवढे त्रस्त होऊ नका. तरुणांना सांगेन की आम्ही येथे जे काही करतो त्याच्या बदल्यात आपल्याला जन्नत किंवा जहन्नूम मिळते. मात्र शहीद जन्नतींच्या जन्नतीमध्ये जातात. त्यामुळे तरुणांनो तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली तरी तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या,' असे आवाहन ओवेसी यांनी केले.  

Web Title: Akbaruddin Owaisi repeats '15 minutes' statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.