‘आकाश’ योजना अखेर बंद
By Admin | Updated: July 12, 2015 22:53 IST2015-07-12T22:53:54+5:302015-07-12T22:53:54+5:30
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने देशातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षणाचे सुलभीकरण घडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन संपुआ सरकारने विद्यार्थ्यांना ‘आकाश’ नामक

‘आकाश’ योजना अखेर बंद
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने देशातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षणाचे सुलभीकरण घडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन संपुआ सरकारने विद्यार्थ्यांना ‘आकाश’ नामक स्वस्त टॅब्लेट पुरविण्याची महत्त्वाकांक्षी योजना बंद झाली आहे. यावर्षी मार्चमध्ये ही योजना बंद झाली असल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून समोर आले आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका वृत्तसंस्थेने आयआयटी मुंबईकडून या योजनेबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार आयआयटी मुुंबईत ‘आकाश’ योजना ३१ मार्च २०१५ रोजी बंद झाली असून यासंदर्भात सर्व लक्ष्ये गाठण्यात यश आले असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे.
‘आकाश’बाबत भविष्यातील कुठल्याही योजनेची माहिती आपल्याकडे नाही. ‘आकाश’ योजनेसाठी ४७.७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि लक्ष्यपूर्तीसाठी ते वापरण्यात आले. डाटाविंड या कंपनीकडून एक लाख ‘आकाश’ खरेदी करण्यात आले,असेही आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)