शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

अकाली दल, तेलुगू देसमने एनडीएकडे केली जागावाटपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:40 IST

बैठकीत उपस्थित राहण्यावरून सस्पेन्स

संजय शर्मानवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी करीत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला शिरोमणी अकाली दल आणि तेलुगू देसम पक्षाकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. एनडीएमध्ये सहभागी होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेत जागावाटपाची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीतील हॉटेल अशोका येथे एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीत ३८ राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, एनडीएच्या बैठकीत जागावाटपावर कोणतीही चर्चा होणार नाही. भाजपच्या राज्य शाखा जागावाटपासाठी मित्रपक्षांशी चर्चा करतील. 

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने लोकसभेच्या ११ पैकी सात जागा मागितल्या आहेत. तर, भाजपसाठी चार जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपने अकाली दलाला अर्ध्या - अर्ध्या जागांवर निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. म्हणजेच भाजप पाच ते सहा जागांची मागणी करीत आहे. त्या बदल्यात विधानसभेत अकाली दलाला ११७ पैकी ६० जागा देण्यास तयार आहे. जागांच्या मुद्द्यावरून अकाली दलाने नाराजी दर्शवत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. 

भाजपला आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षासोबत युती करायची आहे. पण, तेलंगणात भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांना असे वाटते की, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये भाजपकडून जागावाटप व्हावे. तेलंगणात स्वबळावर लढण्याच्या भाजपच्या आग्रहामुळे आंध्र प्रदेशात भाजपची टीडीपीसोबतची युती होऊ शकलेली नाही. मंगळवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत टीडीपीच्या सहभागावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्राबाबू नायडू, अकाली दलाचे नेते सुखबीर बादल कौर, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्याशी एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्याबाबत चर्चा करत आहेत. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात भक्कम जनाधार असलेले राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्याशी सुरू असलेली चर्चाही जागांवर अडकली आहे. जयंत चौधरी पश्चिम उत्तर प्रदेशात लोकसभेच्या चार जागा मागत आहेत. त्यापैकी बागपत आणि मुझफ्फरनगर प्रमुख आहेत. या दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात आहेत.

महाराष्ट्रातून कोण होणार सहभागी? महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (रामदास आठवले गट) एनडीएच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातही अद्याप जागावाटप ठरलेले नाही. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागांबाबत लवकरच चर्चा होईल.

 

टॅग्स :BJPभाजपाTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी