शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

2024 च्या निवडणुकीत मोदींना हरवण्याठी अँटोनींचा काँग्रेसला मोठा 'गुरूमंत्र'; भाजप नेत्यानं केला जोरदार पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:28 IST

अँटोनी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते...

हिंदू व्होट बँकेचे महत्त्व सांगताना काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटोनी यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी बहुसंख्य समाजालाही सोबत घ्यायला हवे. केवळ अल्पसंख्यकांच्या बळावर ही लढाई जिंकता येणार  नाही, असे अँटोनी यांनी म्हटले आहे. ते काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. याच बरोबर, काँग्रेसने हिंदूंबाबत अधिक संवेदनशील राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

अंटोनी म्हणाले, 'भारताच बहुसंख्यक लोक हिंदू आहेत आणि या बहुसंख्यक समुदायाला नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईत सहभागी करायला हवे. त्यामुळे सर्वांनीच सतर्क रहायला हवे. 'फॅसिझमविरुद्धच्या लढाईत' बहुसंख्य समाजाला सोबत घ्यायला हवे."

हिंदूंना सॉफ्ट हिंदुत्वाच्या स्वरुपात दाखवणे अयोग्य - अँटोनी म्हणाले, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांना त्यांच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे, अगदी त्याच पद्धतीने हिंदू समाजातील लोकांनाही मंदिरात जाण्याचे आणि गंध लावण्याचा अधिकार आहे. जेव्हा जेव्हा हिंदू समाजाचे लोक असे करतात, तेव्हा-तेव्हा त्यांना सॉफ्ट हिंदुत्व मानणाऱ्या लोकांच्या स्वरुपात दाखवले जाते.  ही रणनीती योग्य नाही. यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षालाच फायदा होईल आणि तो पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येईल.

भाजपचा पलटवार - अँटोनी यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनाता पक्षाकडून  पलटवार करण्यात आला आहे. यावर बोलताना शहजाद पुनावाला म्हणाले, खरे तर ‘हिंदू को दो गाली, ताकि मिले वोट बैंक की ताली’ अशी काँग्रेसची भूमिका राहिली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने अनेक वेळा प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला. काँग्रेसनेने गीतेची तुलना जिहादसोबत केली. एवढेच नाही,तर हिदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरम या दहशतवादी संघटनांसोबत केली होती. काँग्रेसने व्होट बँकेसाठी सर्वप्रथम हिंदुत्वाचा संबंध दहशतवादाशी जोडला आणि आता त्यांच्याच एका ज्येष्ठ नेत्याने त्यांचे म्हणणे फेटाळले आहे."

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा