अजनीत गुंडाचा हैदोस

By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:06+5:302015-08-13T23:24:06+5:30

नागपूर : अजनीतील रामेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी एका गुंडाने तलवारीच्या धाकावर मोठा हैदोस घातला. चार कार्सच्या काचा फोडल्या आणि एका व्यक्तीला तलवारीने वार करून जबर दुखापत केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

Ajneet Gunda Hedos | अजनीत गुंडाचा हैदोस

अजनीत गुंडाचा हैदोस

गपूर : अजनीतील रामेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी एका गुंडाने तलवारीच्या धाकावर मोठा हैदोस घातला. चार कार्सच्या काचा फोडल्या आणि एका व्यक्तीला तलवारीने वार करून जबर दुखापत केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
गोलू नामक गुंड हातात तलवार घेऊन दुपारी ४ च्या सुमारास रामेश्वरी चौक परिसरात आला. येथे त्याने येणारा जाणाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावणे सुरू केले. रस्त्याच्या कडेला असलेल्या कारच्या काचा फोडल्या. तो कुणालाही थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पांडे नामक एक व्यक्ती त्याला समजावण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्या डोक्यावर तलवार मारली. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, परिसरातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून अजनीचे पोलीस घटनास्थळी पोहचले. तत्पूर्वीच आरोपी गोलू पळून गेला होता. वृत्त लिहिस्तोवर तो पोलिसांच्या हाती लागला की नाही, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
--

Web Title: Ajneet Gunda Hedos