शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ajmer Sharif on PFI Ban: पीएफआयवर केंद्राचा 'सर्जिकल स्ट्राईक', आता अजमेर शरीफ दर्ग्यातून आली मोठी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 14:05 IST

"ही कारवाई कायदेशीरपणे आणि दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्वांनी स्वागत करायला हवे."

केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि तिच्याशी संबंधित संघटनांवर बंदी घातली आहे. यानंतर आता अजमेर दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख जैनुल आबेदीन अली खान यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, ही कारवाई कायदेशीरपणे आणि दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्वांनी स्वागत करायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

'देश सुरक्षित तर आपण सुरक्षित' -खान म्हणाले, 'जर देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत, देश कुठल्याही संस्थेपेक्षा अथवा विचारापेक्षा मोठा आहे. यामुळे जर कुणी हा देश, येथील एकता आणि सार्वभौमत्व अथवा देशाची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला या देशात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पीएफआयच्या देश विरोधी कारवायांसंदर्भात बातम्या येत आहेत आणि पीएफआयवर घालण्यात आलेली बंदी ही देश हिताची आहे. एवढेच नाही, तर मी स्वतः दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा सरकारकडे पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती,' असेही ते म्हणाले. केंद्र सरकारनेदहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप करत पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घातली आहे.

गृह मंत्रालयानं घातली बंदी -केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे, की "पीएफआय आणि त्यांचे सहकारी अशा प्रकारच्या विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी आहेत, ज्यामुळे पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन प्रभावित  झाले आहे. देशाचा घटनात्मक ढाचा कमकुवत करण्याचा, दहशतवादी शासनाला प्रोत्साहन देण्याचा आणि ते लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे केंद्र सरकारचे मत आहे, की पीएफआय आणि तिच्याशी संबंधित संघटनांना तत्काळ बेकायदेशीर संघटना घोषित करणे आवश्यक आहे.

या संघटनांवर घालण्यात आली आहे बंदी -- पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया- रिहैब इंडिया फाउंडेशन- कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया- ऑल इंडिया इमाम काउंसिल- NCHRO- नॅशनल वुमन्स फ्रंट - ज्युनियर फ्रंट - एम्वायर इंडिया फाउंडेशन- रिहैब फाउंडेशन (केरळ) 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTerrorismदहशतवाद