शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 21:40 IST

Praful Patel resigns: प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागी काय होणार? वाचा सविस्तर

Praful Patel resigns: अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. २७ फेब्रुवारी २०२४ला राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यंदाच्या निवडणुकीसाठी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. ते याआधीच राज्यसभेचे सदस्य होते. मे २०२७ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. पण तांत्रिक कारण पुढे करून पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली.

अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, मला राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी अन्य कुणाला संधी मिळेल. त्यामुळे फार अफवा पसरवण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतायेत त्या आम्हाला वाटत नाही. अनेक गोष्टी भविष्यात समोर येतील. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले होते.

प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागी काय होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांच्या जागी पोटनिवडणूक लागेल. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची संमती घेतली आहे. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करुन आमच्या कोअर ग्रुपने हा निर्णय घेतला आहे, असेही नेते सुनील तटकरे म्हणाले. पक्षासमोर दहा जणांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. याबाबत पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बाजूचा विचार करुन पक्षाने हा निर्णय घेतला आहे, असेही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRajya Sabhaराज्यसभा