नवी दिल्लीः काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करत राहुल गांधींचे आभार मानले आहेत. 2015च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतल्या सर्व नेत्यांचं सहयोग मिळालं, बिकट परिस्थितीत नेत्यांनी चांगली साथ दिली. तुमच्या सर्वांचे आभार, असंही अजय माकन म्हणाले आहेत.अजय माकन यांनी गुरुवारी दिल्लीचे प्रभारी पीसी चाको यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली होती. अजय माकन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे.
अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 11:41 IST