शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाशी केली युती अन् वडिलांना मिळाली संचित रजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:39 IST

जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून आले आहेत.

चंदीगड/नवी दिल्ली : हरयाणामधील जननायक जनता पार्टीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांना दोन आठवड्यांसाठी जेलमधून संचित रजा  (फर्लो) मिळाली आहे. अजय चौटाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जेलमधून बाहेर येणार आहेत. सध्या ते दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहेत.  

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा 24 ऑक्टोबरला लागलेला निकाल पाहता दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या जननायक जनता पार्टीला सोबत घेत भाजपाने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिक्षक भरती घोटाळ्यात अजय चौटाला दोषीहरयाणामधील ज्युनिअर बेसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी अजय चौटाला यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. हरायाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे (आयएनएलडी) अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला आणि अजय चौटाला यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच, या घोटाळ्याप्रकरणी एकूण 55 लोकांना कोर्टाने दोषी ठरविले आहे.

जूनपासून चर्चेत होते अजय चौटालागेल्या जून महिन्यात तिहार जेलमध्ये झालेल्या तपासणी दरम्यान अजय चौटाला यांच्याजवळ असलेला मोबाइल जप्त करण्यात आला होता. तेव्हापासून अजय चौटाला चर्चेत आले होते. 

मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री, तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री!हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडीत जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाध्यक्षअमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब केले. राज्यात मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री तर, दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री असतील असे अमित शहा यांनी नंतर पत्रकारपरिषदेत जाहीर केले.मनोहरलाल खट्टर यांची शनिवारी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडे नवे सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्यात येणार आहे. राज्यात स्थिरतेसाठी आपण ही युती केली असल्याचे दुष्यंत चौटाला यांनी सांगितले.

 

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकHaryanaहरयाणाBJPभाजपाElectionनिवडणूक