शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 07:00 IST

पुणे विमानतळावर लवकरच चाचणी

ठळक मुद्देप्रवाशांची अंतर्बाह्य तपासणी करणे शक्यदेशामध्ये शंभरहून अधिक मोठी विमानतळे २८ विमानतळे अतिसंवेदनशील तर ५६ विमानतळे संवेदनशील प्रायोगिक तत्वावर पुणे, कोलकाता व इतर दोन विमानतळांवर हे स्कॅनर लवकरच बसविणार

- राजानंद मोरे- पुणे : सुरक्षिततेच्यादृष्टीने अति संवेदनशील असलेल्या पुणेविमानतळावर बॉडी स्कॅनरबसविणार आहे. या स्कॅनरमुळे प्रवाशांची अंतर्बाह्य तपासणी करणे शक्य होणार असून अवैध वस्तुंची ने-आण करण्याला आळा घालता येणार आहे. देशातील चार विमानतळांवर स्कॅनरच लवकरच चाचणी घेणार आहे. त्यामध्ये पुण्याचा समावेश केला आहे. देशात पहिल्यांदाच विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसविले जात आहेत. देशामध्ये शंभरहून अधिक मोठी विमानतळे आहेत. त्यामध्ये २८ विमानतळे अतिसंवेदनशील तर ५६ विमानतळे संवेदनशील म्हणून ओळखली जातात. अति संवेदनशील विमानतळांमध्ये पुणे विमानतळाचाही समावेश आहे. ब्युरो ऑफ सिव्हील 'अ‍ॅव्हीएशन सेक्युरिटी'ने पहिल्या टप्प्यात या ८४ विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रायोगिक तत्वावर पुणे, कोलकाता व इतर दोन विमानतळांवर हे स्कॅनर लवकरच बसविणार आहेत. ही प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसांत पुणे विमानतळावर चाचणी सुरू केली जाणार आहे. सध्या पुणे विमानतळावर सुरक्षितेसाठी प्रवाशांची तपासणी करण्यासाठी केवळ मेटल डिटेक्टर आहेत. यामध्ये नॉन मेटॅलिक वस्तु आढळून येत नाही. तसेच स्फोटकेही दिसत नाही. पुणे विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाºया प्रवाशांना सातत्याने पकडण्यात येत आहे. त्यासाठी प्रवाशांकडून विविध क्लुप्त्या लढविल्या जातात. एखाद्या संशयित प्रवाशाची तपासणी करण्याची सध्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. तपासणीसाठी बराचवेळ जातो. तसेच एखाद्या प्रवाशाची कसून तपासणी करायची झाल्यास त्याची कपडे, बुट, बेल्ट काढावे लागतात. पण बॉडी स्कॅनरमुळे प्रवाशांची संपुर्ण अंतर्बाह्य तपासणी करणे शक्य होणार आहे. त्याने कपडे किंवा शरीरामध्ये लपविलेली वस्तु सहजपणे निदर्शनास पडणार आहे. नॉन मेटॅलिक वस्तुंचा छडा लागणार आहे. पुणे विमानतळ हवाई दलाचे असून नागरी उड्डाणासाठी मान्यता दिली आहे. हवाई दलाच्या प्रमुख विमानतळांपैकी हे एक विमानतळ असल्याने सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. बॉडी स्कॅनरमुळे ही सुरक्षितता अधिक कडक  होणार आहे. --पुण्यासह अन्य तीन विमानतळांवर बॉडी स्कॅनर ची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच हे स्कॅनर बसवून प्रवाशांची तपासणी सुरू केली जाईल. सुरक्षितेत्या दृष्टीने तसेच प्रवाशांची तपासणीला वेग यावा यासाठी बॉडी स्कॅनर बसविला जाणार आहे. देशातील विमानतळांवर पहिल्यांदाच असे स्कॅनर बसविले जाणार आहेत. - अजय कुमार, संचालक, पुणे विमानतळ अ‍ॅ .........................................................................................................................................................................................................................................                                                                                                                                 

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळairplaneविमानpassengerप्रवासी