विमानात उंदीर असल्यामुळे विमान रद्द
By Admin | Updated: December 30, 2015 19:16 IST2015-12-30T18:58:57+5:302015-12-30T19:16:55+5:30
मुंबईहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच विमान रद्द करण्यात आले, विमानात उंदिर असल्याच्या तक्रारीनंतर विमान रद्द करण्यात आले आहे

विमानात उंदीर असल्यामुळे विमान रद्द
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - मुंबईहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच विमान रद्द करण्यात आले, विमानात उंदिर असल्याच्या तक्रारीनंतर विमान रद्द करण्यात आले आहे, कंपनीकडून प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली आहे.
एअर इंडियाच फ्लाईट क्रमांक AI 131 हे विमान मुंबई कडून लंडन निघाले असता तेहरन जवळ त्यामध्ये उंदीर असल्याच समजताच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परत बोलवण्यात आले, आणि प्रवाशांना जाण्यासाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली.
या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
उंदीर सापडल्यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्याची नामुष्की एअर इंडियावर ओढावल्याने या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश DDCAने दिले आहेत.