शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Airforce-One, बीस्ट कार अन् 50 गाड्यांचा ताफा; G-20 मध्ये जो बायडेन यांची मेगा एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 20:03 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीत उतरल्यानंतर अमेरिकेहून आलेल्या खास गाड्यांमध्येच प्रवास करणार आहेत.

नवी दिल्ली: G-20 परिषदेसाठी परदेशी पाहुणे भारतात येणे सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचत आहेत. केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग बायडेन यांचे स्वागत करणार आहेत. बायडेन एअरफोर्स वन विमानाने दिल्लीला पोहोचतील. एअर फोर्स वन सोबतच दुसरे बॅकअप विमानदेखील असेल.

अमेरिकेच्या एअर फोर्स वनला मिनी पेंटॅगॉन म्हणून ओळखले जाते. यामध्ये सर्व सुरक्षा उपकरणे बसवलेली आहेत. एअर फोर्स वनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे विमान सर्व प्रकारचे हल्ले टाळण्यास सक्षम आहे. जमिनीवर न उतरता या विमानात इंधन भरले जाऊ शकते आणि हे एकाच वेळी न थांबता 12 हजार किमीचा प्रवास करू शकते.

50 वाहनांच्या ताफ्यात दिल्लीत फिरणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन विमानाने दिल्लीत उतरल्यानंतर त्यांच्या बीस्ट वाहनाने प्रवास करतील आणि सुमारे 50 वाहनांचा सुरक्षा घेरा त्यांच्यासोबत असेल. बीस्ट व्हेईकलबद्दल असे मानले जाते की, या गाडीत आण्विक हल्ल्यालाही हाणून पाडण्याची क्षमता आहे. कारला 8 इंच जाड दरवाजे, पॅनिक बटण, स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा, सॅटेलाईट फोनसारख्या सुविधा आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ताफ्यात 50 सुरक्षा वाहने असतील. सुरक्षेमध्ये यूएस इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी सर्व्हिस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन तसेच फॉरेन इंटेलिजेंस सर्व्हिस सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी, म्हणजेच सीआयए कमांडो तैनात केले जातील.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनG20 Summitजी-२० शिखर परिषदdelhiदिल्लीIndiaभारत