विमान म्हशीवर धडकले; प्रवासी बचावले
By Admin | Updated: November 8, 2014 02:17 IST2014-11-08T02:17:37+5:302014-11-08T02:17:37+5:30
सुरतच्या विमानतळावर दिल्लीला जाणारे स्पाईस् जेट एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर आलेल्या म्हशीला धडकल्यानंतर १४६ प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावले.

विमान म्हशीवर धडकले; प्रवासी बचावले
सुरत : सुरतच्या विमानतळावर दिल्लीला जाणारे स्पाईस् जेट एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर आलेल्या म्हशीला धडकल्यानंतर १४६ प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावले. गुरुवारी रात्री ७.२५ वाजता हे विमान उड्डाणाच्या बेतात असताना ते म्हशीवर धडकले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पार्किंग एरियात नेले, बंगळुरू येथून या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत माहिती दिली.
डाव्या बाजूला इंजिन असलेल्या बोर्इंग ७३७-८०० या विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. एस जी-६२२ क्रमांकाचे विमान दिल्लीला जात असताना वैमानिकाला अंधारात म्हैस दिसून आली नाही. १४० प्रवासी आणि ६ विमान कर्मचारी सुरक्षित असून रात्री १०.५५ वाजता सर्व प्रवाशांच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
अनेक विमानतळांवर बेवारस प्राण्यांपासून धोका वाढला आहे. या घटनेनंतर सुरत विमानतळावरील आमच्या कंपनीची सेवा बेमुदत निलंबित ठेवण्यात आली आहे, असे प्रवक्ता म्हणाला. (वृत्तसंस्था)