वायुदलात लवकरच महिला युद्धतुकडी!
By Admin | Updated: August 20, 2014 02:40 IST2014-08-20T02:40:05+5:302014-08-20T02:40:05+5:30
भारतीय वायुदलात आता पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वैमानिकही युद्धमोहिमांमध्ये भाग घेऊ शकतील, असे स्पष्ट संकेत आहेत़ वा

वायुदलात लवकरच महिला युद्धतुकडी!
नवी दिल्ली : भारतीय वायुदलात आता पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वैमानिकही युद्धमोहिमांमध्ये भाग घेऊ शकतील, असे स्पष्ट संकेत आहेत़ वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी हे संकेत दिले आहेत़ येत्या काळात, याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे ते म्हणाल़े
एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत राहा बोलत होत़े शॉर्ट सव्र्हिस कमिशन ऑफिसर्स म्हणून युद्धाशिवाय वायुदलाच्या प्रत्येक शाखेत महिलांना प्रवेश आह़े येत्या वर्षात युद्धतुकडीतही महिला वैमानिकांचा समावेश होण्याची शक्यता आह़े यादृष्टीने भविष्य उज्जवल आहे, असे ते म्हणाल़े अर्थात संरक्षण मंत्रलयासह अन्य काही प्रक्रियात्मक मंजुरी शिल्लक असल्याने हा निर्णय अंमलात येण्यास काही काळ लागू शकतो. असे असले तरी याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे व तो लवकरच औपचारिकपणो जाहीर होईल याचे वायुदल प्रमुखांचे वक्तव्य हे स्पष्ट द्योतक मानले जात आहे. सध्या तिन्ही सेनादलांमध्ये महिलांना अधिकारी म्हणून प्रवेश दिला जात असला तरी सीमेवर जेथे शत्रूच्या हल्ल्यात थेट सामोरे जावे लागण्याची शक्यता असते अशा सक्रिय लढाऊ कामांत त्यांना सहभागी होऊ दिले जात नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)