शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकार ५ जुलैला कोसळणार?; कुमारस्वामींना धक्का देणार काँग्रेसचे नाराज आमदार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 11:43 IST

जेडीएस आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी करून, कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं आणि आपलं सरकार स्थापन केलं. पण आता......

बेंगळुरूः कर्नाटकमधील राजकीय पुन्हा एक नवं वळण घेण्याची चिन्हं आहेत. येत्या पाच जुलैला मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. काँग्रेसचे नाराज आमदार भाजपाला साथ देतील आणि कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल, असं गणित राजकीय वर्तुळात मांडलं जातंय.

जेडीएस आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी करून, कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं आणि आपलं सरकार स्थापन केलं. कुमारस्वामींच्या शपथविधीला तर विरोधकांच्या ऐक्याचंही दर्शन घडलं होतं. पण, सत्तास्थापनेनंतर काँग्रेस-जेडीएसमध्ये संवादाऐवजी वादच सुरू झाले. आधी मंत्रिमंडळातील जागांवरून, मग कॅबिनेट मंत्रिपदांवरून त्यांच्यात कुरबुरी झाल्या. त्या दूर होतात न होतात तोच, आता अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत. त्यांची ही नाराजीच कुमारस्वामी सरकारला महागात पडू शकते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे हा गट भाजपाला जाऊन मिळू शकतो, असं चित्र निर्माण झालंय.  भीक म्हणून मुख्यमंत्रिपद मिळालेलं नाही!

शेतकरी कर्जमाफीचं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आपल्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी उत्सुक आहेत. परंतु, काँग्रेसकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. कर्जमाफीच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पाठिंबा नसल्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. तरीही, कुमारस्वामी मागे हटायला तयार नाहीत. 'उपकार म्हणून मला कुणी मुख्यमंत्रिपद दिलेलं नाही किंवा मला ते भीक म्हणूनही मिळालेलं नाही', असं त्यांनी ठणकावलंय. त्यांचा हा पवित्रा पाहूनच काँग्रेसचे काही आमदार वेगळा विचार करू लागल्याचं कळतं. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८congressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामीPoliticsराजकारण