शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

"शुद्ध हवा देऊ शकत नाही, मग एअर प्युरिफायरवर १८% GST का?" दिल्ली हायकोर्टाचा केंद्राला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:46 IST

दिल्लीतल्या प्रदूषणावरुन एअर प्युरिफायरचा समावेश 'मेडिकल डिव्हाइस' मध्ये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Delhi Pollution: राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली असून सध्या तिथे एअर इमर्जन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कडक शब्दात फटकारले आहे. "जर सरकार नागरिकांना शुद्ध हवा उपलब्ध करून देऊ शकत नसेल, तर किमान एअर प्युरिफायरवरील कर तरी कमी करा," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

एअर प्युरिफायर लक्झरी गोष्ट नाही, तर गरज

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गडेला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, "प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवेत श्वास घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या विषारी हवेच्या परिस्थितीत एअर प्युरिफायरला लक्झरी आयटम मानून १८ टक्के जीएसटी लावणे अनाकलनीय आहे." दिवसाला माणूस २१ हजार वेळा श्वास घेतो, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याची चिंताही कोर्टाने व्यक्त केली.

काय आहे जनहित याचिका?ॲडव्होकेट कपिल मदान यांनी ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारच्या २०२० च्या अधिसूचनेनुसार, एअर प्युरिफायर हे मेडिकल डिव्हाइस या श्रेणीत येते. बहुतांश वैद्यकीय उपकरणांवर ५% जीएसटी लागतो, मग एअर प्युरिफायरवर १८% का असा सवाल याचिकेतून करण्यात आला. वृद्ध, मुले आणि रुग्णांसाठी हे उपकरण आता चैनीची वस्तू नसून जीवनावश्यक वस्तू बनल्याचेही याचिकेत सांगण्यात आलं.

नितीन गडकरींचीही कबुली; ४० टक्के प्रदूषण वाहतुकीमुळे

दुसरीकडे, रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिल्लीतील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. "दिल्लीत दोन-तीन दिवस राहिल्यास मला इन्फेक्शन होते. प्रदूषणात ४० टक्के वाटा हा वाहतूक क्षेत्राचा आहे, ज्याचा मी स्वतः मंत्री आहे." मंत्र्यांच्या या विधानामुळे दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

जीएसटी कौन्सिल घेणार निर्णय?सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, करात कपात करण्याचा निर्णय हा जीएसटी कौन्सिलच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग आहे, ज्यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असतो. त्यावर न्यायालयाने सुनावले की, "आम्हाला फक्त लांबच्या तारखा नकोत, तर सध्याच्या परिस्थितीत ठोस प्रस्ताव हवा आहे. १५ दिवसांच्या अल्प कालावधीसाठी तरी करात सूट देता येईल का, याचा विचार करा."

पुढची सुनावणी २६ डिसेंबरला

एअर प्युरिफायरवर ५ टक्के जीएसटी का लावला जाऊ शकत नाही, याचे ठोस उत्तर शोधण्यासाठी न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. जीएसटी कौन्सिलची बैठक तातडीने होऊन यावर कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो, याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi High Court questions 18% GST on air purifiers.

Web Summary : Delhi HC slams Centre over 18% GST on air purifiers amid pollution crisis. Court questions why a necessity faces luxury tax. Next hearing on December 26.
टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय