शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Video - चेन्नई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडला बिबट्याचा बछडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 16:59 IST

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बिबट्याचा बछडा सापडल्याची घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला.

ठळक मुद्देचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बिबट्याचा बछडा सापडल्याची घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला आहे.चेन्नईतील अन्ना झुऑलॉजिकल पार्कमध्ये बछड्याला सोडण्यात येणार आहे. 

तामिळनाडू - चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बिबट्याचा बछडा सापडल्याची घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला आहे. या प्रकरणी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे तर चेन्नईतील अन्ना झुऑलॉजिकल पार्कमध्ये बछड्याला सोडण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  चेन्नई विमानतळावर असलेला एक प्रवासी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवत बॅग घेऊन विमानतळाबाहेर जात होता. मात्र त्याच्या काही हालचाली संशयास्पद वाटल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता एका महिन्यांचा बिबट्याचा बछडा सापडला. बछड्याला ताब्यात घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला दूध पाजले. चेन्नईतील वाइल्डलाइफ सेंटरमध्ये बछड्याचे मेडिकल चेकअप करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.  प्रवाशाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याची चौकशी केली जात आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्याChennaiचेन्नईAirportविमानतळ