शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:07 IST

उड्डाण करण्यापूर्वी एअर इंडियाचा एक पायलट अचानक आजारी पडला. त्यानंतर पायलटला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या मागे अडचणींचा ससेमिरा लागला आहे. अहमदाबाद अपघात, विमानातील तांत्रिक बिघाड अशा अनेक अडचणींचा सामना एअर इंडिया करत आहे. आता बंगळुरूहून दिल्लीला उड्डाण करण्यापूर्वी, एअर इंडियाचा एक पायलट अचानक आजारी पडला. त्यानंतर पायलटला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि प्रवाशांना नेण्यासाठी एअरलाइनला दुसऱ्या पायलटची व्यवस्था करावी लागली. ४ जुलै रोजी सकाळी त्यांचा एक पायलट अचानक आजारी पडला असल्याची पुष्टी एअर इंडियाने केली.

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, ४ जुलै रोजी सकाळी आमच्या एका वैमानिकाची अचानक तब्येत बिघडली. परिणामी, वैमानिक बेंगळुरू ते दिल्ली हे विमान एआय २४१४ चालवू शकले नाहीत आणि त्यांना ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु, त्यांना त्याच रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

एअर इंडियाच्या वैमानिकाची प्रकृती बिघडली!शुक्रवारी सकाळी बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे कॅप्टन श्रीवास्तव अचानक विमानतळावर बेशुद्ध पडले. शुक्रवारी सकाळी बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या (BLR) 'एआय २४१४'च्या उड्डाणापूर्वी ही घटना घडली. एअर इंडियाच्या वैमानिकाला बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पायलट रुग्णालयात दाखलया घटनेबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, '४ जुलै रोजी सकाळी आमच्या एका वैमानिकाला मेडिकल इमर्जन्सी झाली. त्यानंतर, वैमानिक बेंगळुरू ते दिल्ली हे 'एआय २४१४' विमान चालवू शकला नाही. त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. सध्या, वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.'

त्यांनी सांगितले की, पायलटची अचानक तब्येत बिघडल्यामुळे 'एआय २४१४'चे उड्डाण उशिरा झाले आणि आमच्या कॉकपिट क्रूमधील दुसऱ्या सदस्याने त्याची काळजी घेतली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpilotवैमानिकBengaluruबेंगळूर