राजधानीपेक्षाही कमी पैशांत करा 'एअर इंडिया'चा प्रवास

By Admin | Updated: January 5, 2017 09:44 IST2017-01-05T09:44:21+5:302017-01-05T09:44:21+5:30

राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही कमी दराच्या तिकिटात प्रवास करण्याची संधी प्रवाशांसाठी लवकरच एअर इंडियाकडून उपलब्ध केली जाणार आहे.

Air India's journey to less money than the capital | राजधानीपेक्षाही कमी पैशांत करा 'एअर इंडिया'चा प्रवास

राजधानीपेक्षाही कमी पैशांत करा 'एअर इंडिया'चा प्रवास

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 5 - राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही कमी दराच्या तिकिटात प्रवास करण्याची संधी प्रवाशांसाठी लवकरच एअर इंडियाकडून उपलब्ध केली जाणार आहे.  तिकीट दरांच्याबाबतीत एअर इंडियाने राजधानी एक्स्प्रेसला टक्कर देण्याची पूर्ण योजना आखली आहे. ज्या ज्या मार्गांवर राजधानी एक्स्प्रेस धावते, त्या सर्व मार्गांवर एअर इंडियाकडून ही ऑफर प्रवाशांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
 
येत्या शुक्रवारपासून ही ऑफर सुरू होणार असून 30 एप्रिलपर्यंतच कमी दराच्या तिकिटात प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. मात्र, यासाठी पर्यटनाच्या 20 दिवसांआधी तुम्हाला एअर इंडियाच्या या विशेष ऑफर अंतर्गत तिकिट बूक करणं अनिवार्य आहे.
 
एक्स्प्रेसच्या तिकिट दरांना आव्हान देण्यासाठी केवळ एअर इंडियाच नाही तर अन्य एअर लाईन्स कंपन्याही अशा प्रकारच्या सवलतीतील प्रवासाची योजना गेल्या काही दिवसांपासून आखत आहेत. आर्थिक संकटात सापडलेली 'एअर इंडिया' जास्तीत जास्त प्रवासी आपल्याकडे वळावेत यासाठी अन्य एअरलाईन्स कंपन्यांप्रमाणे स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे.  याचाच एक भाग म्हणून एअर इंडियाकडून हवाई प्रवासातील 'सेल स्कीम' आखली जात आहे.
 

Web Title: Air India's journey to less money than the capital