एअर इंडियाचे खासगीकरण ?

By Admin | Updated: November 10, 2014 23:35 IST2014-11-10T23:35:06+5:302014-11-10T23:35:06+5:30

काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारचे हवाई धोरण मोडीत काढत केंद्र सरकारने आज, सोमवारी नव्या हवाई धोरणाचा मसुदा सादर केला़

Air India privatization? | एअर इंडियाचे खासगीकरण ?

एअर इंडियाचे खासगीकरण ?

नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारचे हवाई धोरण मोडीत काढत केंद्र सरकारने आज, सोमवारी नव्या हवाई धोरणाचा मसुदा सादर केला़ सार्वजनिक क्षेत्रतील भारतीय विमानतळ प्राधिकरण(एएआय) आणि पवनहंस ही हेलिकॉप्टर कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची शिफारस या नव्या मसुद्यात करण्यात आली आह़े सोबतच, मरणासन्न अवस्थेतील एअर इंडियाचा कारभार सुधारण्यासाठी सक्षम पावले उचलण्याचेही यात म्हटले आह़े एअर इंडियाचे शेअरही विक्रीस काढण्याचे संकेत यातून मिळत आहेत़
नागरी हवाई मंत्री अशोक गजपती राजू यांनी हा नवा मसुदा सादर करताना अंतर्गत हवाई संपर्क वाढविणो, सहा मेट्रो विमानतळांना आंतरराष्ट्रीय केंद्र बनविणो, सार्वजनिक खासगी भागीदारीतून विमातळांचा विकास, एअर कार्गो, विमान दुरुस्ती आणि देखरेख तसेच हेलिकॉप्टर वाहतुकीच्या कामांना प्रोत्साहन देऊन प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणो आदी मुद्यांवर भर दिला आहे. 
भारतीय विमान कंपन्यांना विदेशी उड्डाणाची परवानगी देणा:या विद्यमान नियमांची समीक्षा केली जाईल, अशी माहितीही राजू यांनी दिली़ तूर्तास यासाठी किमान पाच वर्षार्पयत देशांतर्गत उड्डाण आणि विमान कंपनीच्या ताफ्यात 2क् विमाने असण्याची अट आह़े
या मसुद्यावर सर्वसंबंधित पक्षांचा सल्ला घेतला जाईल आणि यानंतर पुढील वर्षी जानेवारीर्पयत हा मसुदा लागू होणो अपेक्षित असल्याचे ते म्हणाल़े संपुआ सरकारच्या काळात सादर करण्यात आलेले हवाई धोरण पारदर्शक नसल्याचा आरोपही राजू यांनी केला. 
पारदर्शकता आणण्याच्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण(एएआय) तसेच पवनहंस हेलिकॉप्टर्स लिमिटेडला (पीएचएचएल) शेअर बाजारात आणण्याचा प्रस्ताव आहे, असे राजू म्हणाल़े तथापि एएआय आणि पीएचएचएलला कधी शेअरबाचारात सूचीबद्ध केले जाईल, याबाबत कुठलीही कालमर्यादा निश्चित केली गेलेली नाही़ सरकारची किती भागीदारी विकली जाईल, हेही अद्याप निश्चित नसल्याचे एका अधिका:याने सांगितल़े
पवनहंस, विमानतळ प्राधिकरणाची 
शेअर बाजारात नोंदणी
देशातील विमानतळांची देखभाल, नियंत्रण याकरिता स्थापन करण्यात आलेले विमानतळ प्राधीकरण (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया - एएआय)आणि सरकारी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस या दोन्ही कंपन्यांची भागविक्री करत त्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याचे संकेतही राजू यांनी दिले.
विमानतळ प्राधीकरण ही ‘मिनीर’ श्रेणीतील सरकारी कंपनी असून, देशातील 125 विमानतळांचे व्यवस्थापन सांभाळते. यामध्ये 11 आंतरराष्ट्रीय विमानतळे, 81 देशांतर्गत विमानतळे,  आणि संरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या 25 विमानतळांचे व्यवस्थापन सांभाळते. 
तसेच हवाई वाहतूक नियंत्रणही याच कंपनीतर्फे हाताळले जाते. तर, हेलिकॉप्टर उद्योगातील पवनहंस कंपनीत केंद्र सरकारची हिस्सेदारी 51 टक्के असून ओएनजीसी या सरकारी तेल कंपनीची हिस्सेदारी 49 टक्के इतकी आहे. 
कंपनीच्या ताब्यात 47  हेलिकॉप्टर असून आशिया खंडातील सर्वात मोठी  हेलिकॉप्टर कंपनी म्हणून ओळख आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4एकेकाळी भारताच्या नागरी हवाई वाहतूक सेवेतील आघाडीची कंपनी असलेली एअर इंडिया आज मरणासन्न अवस्थेत असताना या कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आहे का, असे विचारले असता नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी थेट उत्तर देणो टाळल़े
4काहींनी खासगीकरणाचा सल्ला दिला आह़े काहींनी एअर इंडियाला सार्वजनिक क्षेत्रचीच कंपनी म्हणून कायम ठेवणो हिताचे असल्याचे सुचवले आह़े पर्याय अनेक आहेत़ पण याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेतला गेला पाहिजे, असे ते म्हणाल़े 

 

Web Title: Air India privatization?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.