शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:53 IST

Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे. 

Air India Plane Crash Updates: दिल्लीवरून लंडनकडे जाणारे विमानअहमदाबादच्याविमानतळावर उतरले. त्यानंतर काही वेळातच ते तिथून लंडनच्या दिशेने झेपावले, पण काळाने झडप घातली आणि काही वेळात जळून खाक झाले. अनेक प्रवासी मरण पावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात झाला तेव्हा विमानात १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते. याबद्दलची अधिक माहिती आता समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे एआय१७१ बोईंग विमान अहमदाबाद विमानतळापासून १५ किमी अंतरावर कोसळले. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, विमानातील प्रवाशांबद्दल माहिती आली आहे. 

विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक?

लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानामध्ये १६९ भारतीय नागरिक होते. तर ५३ नागरिक ब्रिटनचे होते. प्रवासी १ कॅनडाचा होता. तर ७ पोर्तुगीजे नागरिक होते. 

वाचा >>पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

या विमानात स्त्री आणि पुरुष मिळून एकूण २१७ प्रौढ प्रवासी होते. तर ११ लहान मुले होते, तर दोन बालके होती.

एअर इंडिया विमान अपघात: प्रवाशांची संपूर्ण यादी

वसतिगृहावर कोसळले विमान

एअर इंडियाचे हे विमान मेघानीनगर भागात पडले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तिथे विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्य़ांचे वसतिगृह या इमारतीत असून, इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे वसतिगृहातही जीवित हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. बचाव व मदत कार्यासाठी तातडीने एनडीआरएफच्या जवानांच्या तीन तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ९० जवान गांधीनगरवरून अपघातस्थळी येत आहेत. त्याचबरोबर वडोदऱ्यावरूनही तीन तुकड्या पाठवल्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाairplaneविमान