शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:32 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेतील अपघाग्रस्त विमानात उड्डाणापूर्वी कोणताही बिघाड नव्हता, ते सुस्थितीत होते, असा दावा एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कॅम्पबेल विल्सन यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ग्वाही एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कॅम्पबेल विल्सन यांनी एअर इंडियाच्या महाराजा क्लबच्या सदस्यांना दिली. अहमदाबाद दुर्घटनेतील अपघाग्रस्त विमानात उड्डाणापूर्वी कोणताही बिघाड नव्हता, ते सुस्थितीत होते, असा दावा त्यांनी केला.

‘एआय १७१’ विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना १० हजार तासांपेक्षा अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांना ३४०० तासांपेक्षा जास्त तासांचा अनुभव होता, असे विल्सन यांनी स्पष्ट केले. या विमानाचे उजव्या बाजूचे इंजिन मार्चमध्ये  व डाव्या बाजूचे इंजिन एप्रिलमध्ये तपासले  होते. पुढील तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये होणार होती, असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय उड्डाणात १५ टक्के कपातसुरक्षा तपासणीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने दि. २० जून ते जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणात १५ टक्के कपात केली आहे. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल व दुसरे तिकीट काढायचे असल्यास त्यांना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 केबिन क्रू दीपक पाठक यांची ओळख पटलीविमान अपघातात मृत्युमुखी पडलेले केबिन क्रू दीपक पाठक यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीपक यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बराच कालावधी लागला. डीएनए चाचणीनंतर शुक्रवारी मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह  बदलापूरला आणण्यात येणार आहे.

सहवैमानिक क्लाइव कुंदर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारअहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहवैमानिक क्लाइव कुंदर यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुंदर हे एअर इंडियाच्या एआय १७१ या अहमदाबाद ते लंडन विमानाचे सहवैमानिक होते. कुंदर यांचे पार्थिव गुरुवारी मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तिथे अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. कुंदर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे मित्र, नातेवाइक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमले होते. नंतर शिवडी येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कुंदर यांच्या पश्चात आई-वडील व लहान बहीण आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटना