शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:20 IST

गुरुवारी रात्री गुवाहाटीहून चेन्नईला जाणारे विमान 6E 6764 च्या पायलटने चेन्नई विमानतळावर उतरता न आल्याने बंगळुरुच्या विमानतळाला मेडेचा संदेश पाठविला.

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सर्वच विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्या हाय अलर्टवर आहेत. डीजीसीएने एअर इंडियाची ती वादग्रस्त विमाने तपासली आहेत. या विमानांमध्ये अनेक त्रुटी असल्या तरी त्यांच्यात गंभीर समस्या आढळलेली नाहीय. या विमानअपघाताला आठवडा उलटत नाही तोच गो इंडिगोच्या विमानाने मेडे अलर्ट पाठविल्याने खळबळ उडाली होती. 

गुरुवारी रात्री गुवाहाटीहून चेन्नईला जाणारे विमान 6E 6764 च्या पायलटने चेन्नई विमानतळावर उतरता न आल्याने बंगळुरुच्या विमानतळाला मेडेचा संदेश पाठविला. चेन्नई विमानतळावर ट्रॅफिक जास्त असल्याने या विमानाला बराचवेळ हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या होत्या. यामुळे पुरेसे इंधन असूनही हे विमान उतरू शकले नव्हते. बराच वेळ घिरट्या घालाव्या लागल्याने इंधन कमी झाले होते. यामुळे पायलटने बंगळुरू विमानतळाला इंधन संपत आल्याचा संदेश पाठविला आणि धावपळ सुरु झाली. 

इंधन संपत आलेले असतानाही चेन्नई विमानतळाने गो इंडिगोच्या विमानाला उतरण्याची परवानगी दिली नाही. अखेरीस या विमानाच्या पायलटला तेवढ्याच इंधनाच्या जिवावर बंगळुरुला पाठविण्यात आले. या विमानात प्रवासी देखील होते. तरीही चेन्नईला हे विमान न उतरू देता बंगळुरुला पाठविण्याची जोखीम घेण्यात आली. रात्री सव्वा आठ वाजता हे विमान सुरक्षितरित्या बंगळुरूला उतरले. परंतू, इंधन कमी असताना देखील चेन्नई विमानतळावर का उतरू दिले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

बंगळुरू विमानतळावर मेडे संदेश येताच त्या विमानाला प्राथमिकतेने उतरविण्यात आले. हेच चेन्नई विमानतळ करू शकला असता. बंगळुरूमध्ये हे विमान आल्यावर प्रवाशांना उतरविम्यात आले, विमानात इंधन भरण्यात आले त्यानंतर जवळपास दोन तासांनी पुन्हा प्रवाशांना घेऊन हे विमान चेन्नईला रवाना झाले. डीजीसीएला या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :IndigoइंडिगोPlane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया