शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 21:06 IST

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडेल्या आजी-नातीचे मृतदेह आज कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

Air India Plane Crash: गुजरातच्या अहमबादमध्ये १२ जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानअपघातात २४१ प्रवाशांसह अनेक स्थानिकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर विमान कोसळले, त्यात काम करणाऱ्या स्वयंपाकी सरलाबेन ठाकोर आणि त्यांची दोन वर्षांची नात आद्या हिचाही मृत्यू झाला आहे. डीएनए चाचणीतून त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 

५२ वर्षीय सरलाबेन ठाकोर गेल्या १५ वर्षांपासून बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह परिसरातील मेसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. अपघाताच्या दिवशी त्या त्यांची नात आद्यासोबत मेसमध्ये होत्या, तर त्यांचा मुलगा रवी ठाकोर आणि सून ललिता, जी मेसमध्येच काम करतात, डॉक्टरांचे टिफिन देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. शुक्रवारी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून दोघींचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

माध्यमांशी बोलताना रवी ठाकोर म्हणाले, "घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजता मी आणि माझी पत्नी मेसमधून बाहेर पडलो. दुपारी १:४० वाजता आम्हाला बातमी मिळाली की, मेस आणि वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळले आहे. आम्ही घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा सर्व काही जळून खाक झाले होते. त्या दिवसापासून माझी आई आणि मुलीचा काहीच ठावठिकाणा नव्हता."

डीएनए चाचणीतून खुलासाअपघातानंतर अपघातस्थळावरून अनेक मृतदेह विद्रूपावस्थेत पडले होते, ज्यामुळे मृतांची ओळख पटवणेही अत्यंत कठीण होते. कुटुंबातील सदस्यांनी सरलाबेन आणि आद्या यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. अखेर डॉक्टरांच्या पथकाने अपघातस्थळी सापडलेल्या अवशेषांचे डीएनए नमुने घेतले आणि ते कुटुंबातील सदस्यांच्या नमुन्यांशी जुळवले. आठवड्याभराच्या चाचणीनंतर आज(२० जून) डीएनए चाचणीचा अहवाल आला, ज्यात मृतांमध्ये सरलाबेन ठाकोर आणि तिची नात आद्या यांचा समावेश असल्याचे पुष्टी झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाकोरे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादairplaneविमानAccidentअपघात