शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:25 IST

Air India Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे.

Air India Plane Crash :  अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विमान अपघाताच्या चौकशीत मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याची संयुक्त राष्ट्रांची मागणी भारताने फेटाळून लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत हे मान्य करणार नाही. ब्लॅक बॉक्स डेटाच्या विश्लेषणात विलंब केल्याबद्दल काही सुरक्षा तज्ञांनी टीका केली होती.

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर अपघातानंतर, यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता, संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने त्यांच्या एका तपासकर्त्याला चौकशीत मदत करण्यासाठी भारताला प्रस्ताव दिला होता.

यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) २०१४ मध्ये मलेशियन विमान बेपत्ता झाल्याच्या चौकशी आणि नंतर २०२० मध्ये युक्रेनियन जेटलाइनरच्या चौकशीसारख्या काही तपासात मदत करण्यासाठी तपासकर्त्यांना तैनात केले होते. 

ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे. 

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

अहवाल कधी मिळेल?

रेकॉर्डर्स भारतात वाचले जातील की अमेरिकेत, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. विभाग आयसीएओच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. बहुतेक हवाई अपघात अनेक कारणांमुळे होतात आणि अपघातानंतर सुमारे ३० दिवसांनी प्राथमिक अहवाल प्राप्त होतो.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना