शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:45 IST

Air India Plane Crash : एअर इंडिया विमान अपघाताबाबत चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्याविमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.  या अहवालावर एअरलाइन पायलट्स असोसिएशनने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी १२ जुलै २०२५ एएलपीएचे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी एका निवेदनात तपासावर टीका केली. अहवालात पायलट दोषी मानल्याचा दावा त्यांनी केला.

थॉमस म्हणाले,'विमान अपघात तपास ब्युरोने वैमानिकांना अंधारात ठेवून प्राथमिक अहवाल माध्यमांसोबत शेअर केला. या तपासात पाळण्यात आलेल्या गुप्ततेमुळे आम्हाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली

ALPA ने १० जुलै २०२५ रोजी वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका लेखाचाही हवाला दिला, यामध्ये इंजिन इंधन नियंत्रण स्विचच्या अनवधानाने हालचालीमुळे हा अपघात झाल्याचा, दावा करण्यात आला होता.

संवेदनशील माहिती बाहेर कशी पोहोचली?

ही संवेदनशील माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहोचली यावर असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले. असोसिएशनने म्हटले आहे की, "कोणत्याही जबाबदार व्यक्तीच्या स्वाक्षरीशिवाय मीडियाला इतका महत्त्वाचा दस्तऐवज देण्यात आला याचे आम्हाला आश्चर्य वाटते. या गोष्टी लक्षात घेऊन, आम्ही पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्हाला निरीक्षक म्हणून समाविष्ट करावे, जेणेकरून तपासात पारदर्शकता राखली जाईल."

परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगून, ALPA ने अधिकृत स्वाक्षरीशिवाय कागदपत्रे प्रसिद्ध केल्याबद्दल AAIB वर टीका केली. तसेच त्वरित सुधारणांची मागणी केली. "आम्ही सत्तेत असलेल्यांना, निरीक्षक म्हणूनही, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सहभागी होण्याची विनंती करतो," असे असोसिएशनने म्हटले आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानPlane Crashविमान दुर्घटना