शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:56 IST

Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते.

गुजरातच्या अहमदाबादमधीलएअर इंडियाच्याविमान अपघाताबाबत मोठी बातमी येत आहे. २४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमानअहमदाबाद विमानतळाबाहेरील परिसरात असलेल्या डॉक्टरांसाठीच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेल परिसरातील वाहने जळून खाक झाली असून हॉस्टेलमधील विश्रांती घेत असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागात कोसळले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ती इमारत डॉक्टरांचे हॉस्टेल असल्याचे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राथमिक माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहात कोसळले आहे. २-३ मिनिटांत पोलिस आणि इतर एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. जवळजवळ ७०-८०% परिसर रिकामा करण्यात आला आहे. सर्व एजन्सी काम करत आहेत. कृपया नागरिकांनी रस्ते मोकळे ठेवावेत, जेणेकरून जखमींना ग्रीन कॉ़रिडॉर करून हॉस्पिटलमध्ये नेता येईल.''

या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादairplaneविमानGujaratगुजरात