शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:02 IST

रेस्क्यू ऑपरेशनसाठी येणारी वाहने, रुग्णवाहिका यांच्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला त्याची माहिती सार्वजनिक केली नाही.

गुजरातच्या अहमदाबाद इथं भीषण विमान अपघात घडला. गुरुवारी एअर इंडियाचं AI171 विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणार होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच ६२५ फूटावरून हे विमान खाली जमिनीवर कोसळले. मेघानीनगर भागात या विमानाचा अपघात झाला तिथे BJ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होते. याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर दुर्घटनाग्रस्त विमान धडकले. हॉस्टेलमध्ये कॅन्टिनमध्ये मेडिकलचे विद्यार्थी जेवत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यानंतरचे अनेक फोटो समोर आलेत. या फोटोत विमानाचा मागील भाग इमारतीत घुसल्याचे दिसत आहे. विमानाच्या धडकेमुळे संपूर्ण इमारतीला आग लागली आणि आकाशात काळा धूर पसरला. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ  टीमसह अग्निशमन दलाच्या गाड्या रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. त्याशिवाय आणखी २ टीम तिथे रवाना झाल्यात. या दुर्घटनेनंतर अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला आहे. जिथे जखमींवर उपचार सुरू आहेत. अहमदाबादचे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. 

विमान दुर्घटनेत रस्ते वाहतुकीवर परिणाम

घटनास्थळी ३ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून या दुर्घटनेतील जखमींना आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. विमान इमारतीला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला. विमानाला आग लागली. त्यानंतर संपूर्ण विमान जळून खाक झाले. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. रेस्क्यू ऑपरेशनसाठी येणारी वाहने, रुग्णवाहिका यांच्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला त्याची माहिती सार्वजनिक केली नाही.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर अहमदाबादच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा सक्रीय केल्या आहेत. दुर्घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी ५ रुग्णवाहिका तयार आहेत. दुपारी १.३९ मिनिटांनी अहमदाबादच्या रनवे २३ वरून एअर इंडियाच्या या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर काही मिनिटांत विमान नागरी वस्तीत कोसळले. उड्डाण भरल्यानंतर पायलटने ATC ला MayDay कॉल दिला होता परंतु त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला. विमानात २४२ प्रवासी होते. त्यात २ पायलट, १० कू मेंबर्ससह २३० प्रवासी होते.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात