शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या वैमानिकाची सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी, चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 10:36 IST

एअर इंडियाच्या एक वरिष्ठ वैमानिकानं स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारीनंतर एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली- एअर इंडियाच्या एक वरिष्ठ वैमानिकानं स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारीनंतर एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाच्या वरिष्ठ  वैमानिकानं सहकारी वैमानिकाला कमीत कमी दोनदा विमानात कथित स्वरूपात कु-हाडीनं मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर एअर इंडियानंही त्या वरिष्ठ वैमानिकाला कामावर येण्यास मज्जाव केला आहे. प्रशिक्षक वैमानिकानं कथित स्वरुपात स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिली.सूत्रांच्या माहितीनुसार कोलकाताहून दीमापूर येथे जाणा-या एअर इंडियाच्या 709 या विमानाच्या कॉकपिटमध्ये 18 जानेवारी 2018ला सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणात एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत.   तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानसेवा देणारी कंपनी गो-एअरच्या वैमानिकानेही दिलेल्या धमकीमुळे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. संबंधित वैमानिकाने दिल्ली-बंगळुरू विमान क्रॅश करण्याची धमकी दिली होती. मात्र, ही घटना केव्हाची आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे गो-एअर प्रशासनाने या वृत्ताचं खंडन केलं होतं. आधीच वैमानिकामुळे विमान उड्डाणाला उशीर झाला होता. थोड्या वेळाने वैमानिक विमानाच्या दिशेने येताना दिसला. वैमानिकाला पाहून काही प्रवाशांनी मोबाइल काढला आणि त्याची शूटिंग करण्यास सुरुवात केली. प्रवासी शूटिंग करत असल्यामुळे वैमानिक चिडला आणि त्याने शूटिंग करण्यास मनाई केली. पण आम्ही शूटिंग करणारच आणि हे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू असं प्रवासी म्हणाले. त्यावर वैमानिकाने धमकी दिली.  जर सोशल मीडियात फोटो शेअर केले तर विमान क्रॅश करेल अशी धमकी वैमानिकाने दिली असा दावा प्रवाशाने केला होता.  वैमानिकाने दिलेल्या धमकीबाबत त्या प्रवाशांनी विमानातील इतर प्रवाशांना सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी विमानातील वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं होतं. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpilotवैमानिक