शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 19:44 IST

Air India Freedom Sale: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने खास 'Freedom Sale' आणला आहे.

Air India Freedom Sale: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Air India Express ने एक खास 'फ्रीडम सेल' सुरू केला आहे. याअंतर्गत, फक्त १,२७९ रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि ४,२७९ रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करू शकता. ही ऑफर ठराविक काळासाठी असल्यामुळे इच्छुकांनी लवकर लाभ घ्यावा.

कधी बुकिंग करता येणार?

'फ्रीडम सेल' अंतर्गत तुम्ही १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या प्रवासासाठी बुकिंग करू सकता. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावे लागेल. ही ऑफर आज(१० ऑगस्ट) पासून अधिकृत वेबसाइट (www.airindiaexpress.com) आणि एअरलाइनच्या मोबाइल अॅपवर लॉन्च सुरू झाली आहे. ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान इतर प्रमुख प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्मवरदेखील हे उपलब्ध असेल.

'फ्रीडम सेल' अंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेस देशांतर्गत उड्डाणांसाठी किमान १,२७९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी किमान ४,२७९ रुपये भाडे आकारत आहे. तसेच, इतर अनेक फायदे देखील मिळतील. अधिकृत वेबसाइटनुसार, 'गौरमायर' हॉट मील, केबिन आणि एक्स्ट्रा चेक-इन बॅगेज आणि एक्सप्रेस अहेड सारख्या सेवांवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

या गोष्टी लक्षात ठेवाएअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, सवलतीच्या दरात बेस फेअर, कर, विमानतळ शुल्क यासारखे शुल्क समाविष्ट नसतील. प्रवासी अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवरून ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात. नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास एक्सप्रेस लाइटच्या भाड्यावर 'शून्य' शुल्क आकारले जाईल. मात्र, तिकीट रद्द केल्यास रक्कम परत केली जाणार नाही. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तिकिटे उपलब्ध आहेत. सवलतीच्या जागा बुक झाल्यानंतर फ्लाइट बुकिंगवर नियमित शुल्क लागू होईल.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTravel Tipsट्रॅव्हल टिप्सairplaneविमान